आॅनलाईन लोकमतअमरावती : अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अॅम्ब्युलन्सची धडक लागल्याने एकाच कुटुंबातील चौघे ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. चौघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.लोणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १४ सीएल-१८९३ क्रमांकाची रुग्णवाहिका अकोलामार्गे लोणीहून मानाकडे जात होती, तर एमएच ४० एआर ५९७० क्रमांकाची वॅगन आर कार ही अकोला येथून अमरावतीकडे येत होती. दरम्यान, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यात चौघे जागीच ठार झाले. नागपूरच्या वाडी येथील रोकडे कुटुंबातील सात जण कारने येत होते. यामध्ये निखिल (२७), अनिता रोकडे (५५), रमेश रोकडे (५०), बाबाराव रोकडे, मनीषा, सोहम व अमृता या रोकडे कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मनीषा, रमेश, बाबाराव, सोहम या चौघांचा समावेश आहे. जखमींमध्ये कारमधील तिघांसह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील १०८ अॅम्ब्युलन्समधील डॉ. रवींद्र ठाकरे (२७), चालक महेंद्र यशवंत खाडे (४०) यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक नागेश चतरकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: नागपुरातील चौघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 09:34 IST
अकोला राष्ट्रीय महामार्गावरील नागझिरी फाट्यासमोर कारला अॅम्ब्युलन्सची धडक लागल्याने एकाच कुटुंबातील चौघे ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली.
अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: नागपुरातील चौघे ठार
ठळक मुद्देकार-अॅम्ब्युलन्सची भीषण धडकमृत एकाच कुटुंबातील