लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वरोडा शिवाराजवळ अपघात होऊन नागपूर येथील आठ जण ठार झाल्याच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोच त्याच ठिकाणी आज शुक्रवारी ट्रक व चारचाकी वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे या वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघातामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून झालेल्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राप्त महितीनुसार कळमेश्वरवरून सावनेरकडे जात असलेल्या चारचाकी कार क्र एम.एच. ३१ एफ.ए-७८५१ ला वरोडा शिवररातील पोल्ट्रीफार्म जवळ विरु द्ध दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक युपी-९४ टी- ४६५७ चा कट लागल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार झाडांवर आदळली यात यात करचालकासह एक अन्य गंभीर जखमी झाले. जखमींना सावनेर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यामध्ये संदीप जोव्हारी वय ३५, डॉली संदीप जोव्हारी वय ३० व लहान मुलगा वय १ वर्षे हे जखमी झाले असून ते गोरेवाडा नागपूर येथील रहिवासी आहे. या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रकाश उईके करीत आहे.
नागपूर जिल्ह्यातील वरोडा येथे पुन्हा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:52 IST
वरोडा शिवाराजवळ अपघात होऊन नागपूर येथील आठ जण ठार झाल्याच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोच त्याच ठिकाणी आज शुक्रवारी ट्रक व चारचाकी वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे या वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघातामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून झालेल्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील वरोडा येथे पुन्हा अपघात
ठळक मुद्देट्रक व चारचाकीची आमोरासमोर धडक : दोन गंभीर जखमी