शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:22 AM

चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत आॅफ लाईन दावे स्वीकारणे बंद होणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे प्रादेशिक आयुक्त विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविकास कुमार यांची माहिती : पैसा अन् वेळेची होईल बचत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात येत असून डिसेंबर अखेरपर्यंत आॅफ लाईन दावे स्वीकारणे बंद होणार आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे प्रादेशिक आयुक्त विकास कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.विकास कुमार म्हणाले, आॅनलाईन दावे स्वीकारल्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निधी कार्यालयात यावे लागणार नाही. त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल. याशिवाय यापूर्वी दावा केल्यानंतर खात्यात रक्कम जमा होण्यासाठी २० दिवस लागत होते. आता ही प्रक्रिया केवळ सात दिवसात पूर्ण होऊन खात्यात पैसे जमा होतील. आधुनिक युगात प्रत्येक ठिकाणी संगणकाची सुविधा आहे. त्यामुळे कर्मचारी आपला दावा सहजरीत्या आॅनलाईन करू शकतात. पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेनुसार १ एप्रिल २०१६ नंतर नवी नोकरी देणाऱ्या कंपनीला कर्मचाऱ्यांचे ईपीएफचे पैसे भरण्याची गरज नसून हे पैसे तीन वर्षापर्यंत केंद्र शासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, भविष्य निधी कार्यालयाच्या अंतर्गत १ लाख १६ हजार निवृत्ती वेतनधारक आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. कार्यालयाद्वारे आतापर्यंत ६० हजार जणांचे जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी पूर्वी कर्मचाऱ्यांना या कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता हे काम बँकेद्वारे होत असून बँकेला त्यासाठी कमिशन देण्यात येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी या बँकेत अपडेट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीonlineऑनलाइन