गोल्डन फाईव्ह अंगिकारा, सकारात्मक विचार ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:14+5:302021-04-20T04:08:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्याच मनात भीती आहे. तर अनेकांना रुग्णालयात बेड मिळणार नाही, हीच भीती ...

Accept the Golden Five, keep positive thinking | गोल्डन फाईव्ह अंगिकारा, सकारात्मक विचार ठेवा

गोल्डन फाईव्ह अंगिकारा, सकारात्मक विचार ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटामुळे प्रत्येकाच्याच मनात भीती आहे. तर अनेकांना रुग्णालयात बेड मिळणार नाही, हीच भीती जास्त आहे. माणसाच्या मनातील भीतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. यापासून दूर राहण्यासाठी सुवर्ण ५ (गोल्डन फाईव्ह)चा अंगिकार करा, यात चांगली व पुरेशी झोप, सकाळी नियमित व्यायाम, प्राणायाम व योगा, व्यसनांपासून दूर राहणे आणि चांगले व सकारात्मक विचार बाळगावे, असा सल्ला नागपूर मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे आणि एनकेपीएसआयएमएस आणि लता मंगेशकर हॉस्पिटलचे मानसोपचार विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भावे यांनी कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी दिला. मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कोविडची भीती घालविण्याचे उपाय या विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोनामुळे अनेक वास्तविक समस्या निर्माण झालेल्या आहेत. या परिस्थितीमुळे काळजी व चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. आपल्या मनातील भीतीचा थेट परिणाम मानसिक व शारीरिक प्रभाव पडतो. भीतीमध्ये असल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती ४८ तासापासून कमी व्हायला लागते. आपल्या मनातील भीती आपल्याला गंभीर आजाराकडे नेऊ शकते. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढतात त्याचा परिणाम ऑक्सिजनवर होतो. त्यामुळे भीती बाळगणे सोडा. भीती कमी करण्यासाठी सोशल मीडियावरील संदेशावर विश्वास ठेवणे सोडा, ते वाचू नका, पसरवू नका. याशिवाय न्यूज पाहणे बंद करा, वर्तमानपत्र वाचा. मनावर नियंत्रण ठेवा, सकारात्मक राहा, असेही सुधीर भावे व सुशील गावंडे यांनी सांगितले.

Web Title: Accept the Golden Five, keep positive thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.