मेट्रो रेल्वेसाठी जागेचे सर्वेक्षण वेगात
By Admin | Updated: February 5, 2015 01:07 IST2015-02-05T01:07:14+5:302015-02-05T01:07:14+5:30
अपघातावर नियंत्रण आणि वाहतुकीवरील भार कमी करण्यासाठी नागपुरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागेचे सर्वेक्षण वेगात सुरू आहे. दोन भागात असलेल्या मार्गावर

मेट्रो रेल्वेसाठी जागेचे सर्वेक्षण वेगात
वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : कार्यालय लवकरच नवीन जागेत
नागपूर : अपघातावर नियंत्रण आणि वाहतुकीवरील भार कमी करण्यासाठी नागपुरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागेचे सर्वेक्षण वेगात सुरू आहे. दोन भागात असलेल्या मार्गावर २०-२० जण काम करीत असून त्यांनी ३.५ कि़मी.च्या मार्गाचे संरेखन पूर्ण केले आहे. शिवाय जमीन समांतर करून ६०-६० मीटर अंतरावर मार्किंग करण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात नव्या कार्यालयातून कामकाज
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे काम रविभवनातील कॉटेज क्रं. ३० येथून सुरू आहे. हे कार्यालय पुढील आठवड्यात सिव्हिल लाईन्स, त्रिकोणी मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत जाणार आहे. याच कार्यालयात बोर्डाची पहिली बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून यामध्ये कंपनीच्या रूपरेषावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्यासोबत नासुप्रचे अधिकारी कार्यरत आहेत. एकूण ३८.२१५ कि़मी. लांबीच्या मार्गांपैकी मेट्रो रेल्वे ३३.६१५ कि़मी. मार्गावर वरून (एलिव्हेटेड), तर ४.५ कि़मी. अंतरापर्यंत जमीन पातळीवर असणार आहे. चिंचभवन परिसरात संरेखनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो मार्गासाठी २० मीटर रुंद जागा मोकळी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)