शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साकोली-वडसा महामार्गाच्या कामाला गती द्या : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:45 IST

साकोली ते लाखांदूरदरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

ठळक मुद्दे रविभवनातील बैठकीत निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : साकोली ते वडसादरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. साकोली ते लाखांदूरदरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.या मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रविवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एम. जयस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, भंडारा येथील उपविभागीय अभियंता संजीव जगताप उपस्थित होते.यावेळी पटोले म्हणाले, साकोली ते वडसादरम्यान सुरू असलेल्या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, मात्र या कामाला अपेक्षित गती नाही. या कामासाठी जागोजागी करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनधारकांना अडथळे निर्माण होत असल्याने, या रस्त्यावर अपघातही वाढले आहेत. त्यामुळे या मार्गाचे काम अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी या कामावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी इतर मार्गांच्या कामांचाही आढावा घेतला.सहयोगनगर येथील मैदानाचा प्रश्न निकाली काढा नागपूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला लीजवर देण्यात आलेले शहरातील सहयोगनगर येथील मैदान नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे. याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका यांनी नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल तेली-उगले उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेhighwayमहामार्ग