शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.

ठळक मुद्देपूनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या पाचव्या व तिसऱ्या सत्राचे निकाल लागलेले नाहीत. सोबतच पहिल्या सत्राचे निकाल संकेतस्थळावर दाखविण्यात येत नाहीत. सोबतच बीकॉमच्या अभ्यासक्रमात परीक्षेच्या अगोदर बदल करण्यात आले आहेत. तसेच पूनर्मूल्यांकनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत असल्याचा आरोप करत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात दुपारच्या वेळी धडक दिली. यावेळी सुरक्षेच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांतर्फे करण्यात आला. बरेच विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी तर दीक्षांत सभागृहातच घोषणा दिल्या.‘अभाविप’चा सुरक्षारक्षकांवरच आरोपदुसरीकडे ‘अभाविप’चे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी सुरक्षारक्षकांवरच आरोप केले आहेत. शांततेने निवेदन द्यायला जात असताना सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर थांबविले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान ‘अभाविप’च्या मागण्याचा सकारात्मक विचार करुन त्यांना मंजूर करण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिवांनी दिले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी विधीसभा सदस्य विष्णू चांगदे, वामन तुरके हेदेखील उपस्थित होते.पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिकादरम्यान हा गोंधळ होत असताना विद्यापीठात पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. मात्र त्यांनी कुठलीही मध्यस्थी केली नाही. गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. मात्र पोलीस तक्रार करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन