सिनेट पदवीधर मतदारसंघावर अभाविपचा झेंडा; महाविकास आघाडीला धक्का
By आनंद डेकाटे | Updated: March 22, 2023 14:26 IST2023-03-22T14:25:58+5:302023-03-22T14:26:50+5:30
फुलेकर, शेराम, तुर्के, फुडके, खेळकर विजयी; चव्हाण, हनवते, चुटे, गावंडे, चांगदे आघाडीवर

सिनेट पदवीधर मतदारसंघावर अभाविपचा झेंडा; महाविकास आघाडीला धक्का
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघावर यंदाही अभाविपने झेंडा फडकवला. महाविकास आघाडीला धक्का देत आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला. तर खुल्या वर्गामध्ये सुद्धा अभाविपचे चव्हाण,चुटे, गावंडे व चांगदे हे चार जण आघाडीवर आहेत. मतमोजणी बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे, सायंकाळपर्यंत पूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
नागपूर विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर अधिसभा मतदारसंघामध्ये ६० हजार मतदारांमधून केवळ १३ हजार ८०० मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. केवळ २३ टक्के मतदान झाले. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राखीव जागांवर ‘अभाविप’चे उमेदवार प्रथमेश फुलेकर (अनुसूचित जाती), दिनेश शेराम (अनुसूचित जमाती), सुनील फुडके (इतर मागासवर्ग ओबीसी), वामन तुर्के (भटके व विमुक्त जमाती, आणि रोशनी खेलकर (महिला प्रवर्ग) यांनी विजय प्राप्त केला. खुल्या प्रवर्गाचे मतमोजणी अजुनही सुरू आहे. आतापर्यंत अभाविपचे अजय चव्हाण,वसंत चुटे, निलेश गावंडे, विष्णू चांगदे आघाडीवर आहेत.