लुधियानातील इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अत्याचार, विवाहित महिलेकडून उकळले सात लाख
By योगेश पांडे | Updated: April 7, 2024 22:40 IST2024-04-07T22:39:51+5:302024-04-07T22:40:00+5:30
नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्याने ते फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सात लाख रुपये उकळले.

लुधियानातील इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अत्याचार, विवाहित महिलेकडून उकळले सात लाख
नागपूर : लुधियानातील एका इन्स्टाग्राम फ्रेंडने विवाहीत महिलेवर अत्याचार करत तिला ब्लॅकमेल केले व तिच्याकडून सात लाख रुपये उकळले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
साहील मल्होत्रा (३०, लुधियाना) असे आरोपीचे नाव आहे. त्याची ४९ वर्षीय महिलेसोबत इन्स्टाग्रामवर ओळखी झाली. नोव्हेंबर २०२२ मध्ये तो तिच्या घरी आला व घरी कुणीच नसताना तिच्या कोल्ड्रीकमध्ये गुंगीचे औषध टाकत तिला बेशुद्ध केले. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला व फोटो-व्हिडीओ काढले.
नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्याने ते फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सात लाख रुपये उकळले. अखेर महिलेने हिंमत दाखविली व अजनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी साहीलविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.