अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:45+5:302021-02-24T04:09:45+5:30
रेवराल : आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. शिवाय, याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकीही आराेपीने दिली. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रेवराल : आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. शिवाय, याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकीही आराेपीने दिली. दरम्यान, आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव (रेल्वे) येथे साेमवारी (दि. २२) उघडकीस आली.
विशाल युवराज मेश्राम (३२, नवेगाव (रेल्वे), ता. माैदा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना, आराेपीने घरात प्रवेश केला. पीडित मुलीचे दाेन्ही हात दाेरीने बांधून व तिचे ताेंड दाबून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय, याबाबत कुणालाही माहिती दिल्यास ‘मी तुझ्या भावाला मारून टाकीन,’ अशी धमकीही आराेपीने पीडितेला दिली. या प्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ३७६, ४४८, ५०६, सहकलम ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पाेलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.