बँकेच्या अॅपचा गैरवापर, कोट्यवधींची रक्कम एका खात्यातून दुस-या खात्यात
By Admin | Updated: May 11, 2017 16:13 IST2017-05-11T16:13:51+5:302017-05-11T16:13:51+5:30
बँकेच्या यूपीआय अॅपचा गैरवापर करून कोट्यवधींची रक्कम आपल्या खात्यातून दुस-या खात्यात परस्पर वळती करून अनेक ठगबाजांनी विविध बँकाना गंडविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

बँकेच्या अॅपचा गैरवापर, कोट्यवधींची रक्कम एका खात्यातून दुस-या खात्यात
नागपूर : बँकेच्या यूपीआय अॅपचा गैरवापर करून कोट्यवधींची रक्कम आपल्या खात्यातून दुस-या खात्यात परस्पर वळती करून अनेक ठगबाजांनी विविध बँकाना गंडविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नागपुरातील लकडगंजमध्येही अशा प्रकारची एक घटना घडली असून, या प्रकारामुळे बँकींग वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बँक खात्याशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल आणि ई मेल आयडीचा वापर करून बँकेच्या यूपीआय अॅपला आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येतो. त्याद्वारे आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करणे, तेथून दुस-या खात्यात वळती करणे, असे व्यवहार करता येतात. बँक खातेधारकाच्या मागणीनुसार, बँकेची आॅनलाईन प्रनाली हे व्यवहार पार पाडते. त्याचा काही ठगबाजांनी पद्धतशीर दुरूपयोग करून घेतला आहे. आपल्या खात्यात एक रुपया नसताना आॅनलाईन बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून काही जण परस्पर लाखो रुपये दुस-या खात्यात वळते करतात. नंतर ही रक्कम काढून घेतली जाते. अशा प्रकारचे अनेक गुन्हे राज्यभरात झाले असून, बँकेला अनेक ठगबाजांनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे. नागपुरातील लकडगंज भागा