बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा दुरुपयोग
By Admin | Updated: June 11, 2016 03:24 IST2016-06-11T03:24:18+5:302016-06-11T03:24:18+5:30
अंबाझरी उद्यानाला लागून महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे.

बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा दुरुपयोग
नागपूर : अंबाझरी उद्यानाला लागून महापालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे. ज्या उद्देशातून, विचारातून व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून हे भवन बांधण्यात आले होते परंतु या भवनाची अवस्था लक्षात घेता भवनाचा उद्देश मागे पडला आहे. केंद्रीय जनविकास पार्टीतर्फे भवनाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी महापालिका आयुक्त, महापौर यांना निवेदन देण्यात आले. परंतु भवनाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही वास्तू असामाजिक तत्त्वांच्या विळख्यात आली आहे. भवनाचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. आतील मालमत्ता संपूर्ण नाहीशी झालेली आहे. आजूबाजूचा संपूर्ण कचरा भवनाच्या बाजूला टाकण्यात येतो. रात्री असामाजिक तत्त्वांकडून जेवणाच्या, दारूच्या पार्ट्या येथे नियमित होतात. त्याचबरोबर अवैध कामे येथे होतात. दुपारच्या सुमारास युगुलांकडून अश्लील चाळे येथे होतात. कधी काळी येथे सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व्हायचे. आता भवनाच्या दुरवस्थेमुळे हे भवन लयास गेले आहे. भवनाची दुरुस्ती करून, सुरक्षा व्यवस्था तैनात करून, नियमित स्वच्छता ठेवून या वास्तूचा उपयोग व्हावा, अशी मागणी चेतन राजकारणे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)