बाजार समिती सभापतीचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:29+5:302021-02-06T04:13:29+5:30
कामठी : कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांची मुंबई बाजार समितीच्या नियमन समिती सभापतिपदी नुकतीच निवड ...

बाजार समिती सभापतीचा गाैरव
कामठी : कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांची मुंबई बाजार समितीच्या नियमन समिती सभापतिपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचा कामठी नगर काॅग्रेस कमिटीच्यावतीने गाैरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही हुकूमचंद आमधरे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष माेहम्मद शहाजहा शफाअत अन्सारी, अफाज अहमद, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा यादव, राजकुमार गेडाम, आबिद ताजी, विष्णू चनोले, शंकर वाडीभस्मे, मुस्ताक ठेकेदार, मंदा चिमणकर, शाहिदा कलिम अन्सारी, ममता कांबळे, नीरज यादव, प्रमोद मानवटकर, सूर्या बानो यांच्यासह काॅँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.