शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:24 IST

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांच्या अस्तित्वापुढे शिकारीचे संकट घोंगावत आहे. सन १९०० मध्ये जगात असलेले एक लाख वाघ आता फक्त ४,४०० शिल्ल्क राहिले आहेत. देशात २,९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ उरले आहेत. जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.जगात वाघाच्या नऊ प्रजाती होत्या. त्यातील कॅस्पियन, जावनिय आणि बॅलिनिज या तीन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिमेकडील जंगलात वाघाचे प्रमाण बरेच घटले आहे. विदर्भात अधिक वाघ असून पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ही संख्या अधिक आहे.वाघांच्या शिकारी, तुटत चाललेली अन्नसाखळी हे संख्या घटण्यामागील कारण सांगितले जाते. यासोबतच रस्ता अपघात, करंट लागल्याने होणारे मृत्यू, संघटित शिकारी टोळ्या, तस्करांकडून असणारे धोके ही सुद्धा कारणे सांगितली जातात.भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना होते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली. तेव्हा देशात १,४११ वाघ होते, सन २०१० साली दुसरी गणना झाली तेव्हा १,७०६, सन २०१४ साली तिसरी गणना झाली तेव्हा देशात २,२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन २०१८ मधील चौथ्या गणनेत देशात २,९६७ वाघ झाले आहेत.महाराष्ट्रही आघाडीवरराष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अंदाजपत्रानुसार देशात २,९६९ वाघांचा अधिवास आहे. या अहवालानुसार व्याघ्रसंवर्धनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, राज्यात ३१२ वाघ असल्याचे समोर आले. २०१४ साली राज्यात वाघांची संख्या १९० होती. ती आता ६४ टक्क्यांनी वाढली आहे.व्याघ्रसंवर्धनात पहिली पाच राज्येराज्य                     सन-२०१४                        सन-२०१८                    स्थानमध्य प्रदेश                ३०८                                 ५२६                        प्रथमकर्नाटक                  ४०६                                ५२४                        द्वितीयउत्तराखंड                ३४०                                ४४२                        तृतीयमहाराष्ट्र                  १९०                                 ३१२                         चतुर्थतामिळनाडू            २२९                                 २६४                        पाचवेराज्यातील उत्तम चित्र हे संरक्षणात्मक आणि संघटनात्मक कामाचे फलित आहे. नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य वन विभागाच्या वतीने व्याघ्र संवर्धनासाठी निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे.- नितीन काकोडकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

टॅग्स :Tigerवाघ