शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 20:29 IST

उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली.

ठळक मुद्देआठवड्याभरानंतर उजेडात आले प्रकरण४० टक्के व्याजासह मागितली मूळ रक्कम

आॅनलाईन लोकमतनागपूर : उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. तक्रारकर्ता वानाडोंगरी येथील ३२ वर्षीय विजय शंभूनाथ बंड आहे. विजय हा दारूच्या दुकानात काम करीत होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार विजयने दोन वर्षापूवी वायसीसी कॉलेज जवळ राहणाºया आकाश बंडू झाडे याच्याकडून १ लाख रुपये ४० टक्के व्याजाने उधार घेतले होते. विजयने काही महिन्यातच उधारीचे पैसे व्याजासह परत केले. त्यानंतर पुन्हा झाडे याच्याकडून ३ लाख रुपये उधार घेतले. या उधारीवरून त्यांच्यात वाद सुरू होता.झाडे हा विजय याला मूळ राशीसह ४० टक्के व्याज देण्याची मागणी करीत होता. परंतु विजयकडून देण्यास उशीर होत असल्याने, झाडे संतप्त झाला होता. २६ नोव्हेंबरच्या दुपारी आकाश झाडे, संगीता जाधव, रामराव आवळे, बबिता खंडारे व सूरज नावाची व्यक्ती विजयकडे आले. विजयने काही रक्कम परतही केली. त्याने ४० टक्के व्याज भरपूर झाल्याचे सांगून काही दिवसांची मुदत मागितली. आरोपी त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी विजयला मारपीट केली. आरोपींनी त्याला मारहाण करून, त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. वानाडोंगरी परिसरात नेऊन जोरदार मारपीट केली. पैसे परत न केल्यास जीवाने मारण्याची धमकीही दिली.या घटनेमुळे घाबरलेल्या विजयने पोलिसात देखील तक्रार केली नाही. मारपीट केल्यानंतरही आरोपी त्याला फोनवरून धमकावत होते. त्यामुळे त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण, मारपीट व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून २४ तास झाल्यानंतरही पोलिसांना आरोपीचा पत्ता लागला नाही. एमआयडीसी पोलीस प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तपास अधिकारी पीएसआय जाधव यांना बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणी जाधव यांचा भूमिका संदिग्ध असल्याचे सांगण्यात येते. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक हे बैठकीत व्यस्त असल्याने घटनेची माहिती देऊ शकले नाही. ठाण्यातील उपस्थित पोलीस कर्मचाºयांनाही घटनेची विस्तृत माहिती नव्हती.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर