गुप्तधनासाठी अपहरण?

By Admin | Updated: June 24, 2014 01:03 IST2014-06-24T01:03:15+5:302014-06-24T01:03:15+5:30

गोरेवाडा येथील गवळी मोहल्ल्यातील १५ वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. दहा दिवस लोटूनही त्याचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. यातच तो ‘पायाळू’ असल्याने गुप्तधनासाठी त्याचे अपहरण करण्यात

Abduction for espionage? | गुप्तधनासाठी अपहरण?

गुप्तधनासाठी अपहरण?

दहा दिवसांपासून मुलगा बेपत्ता : शोध कोण घेणार
नागपूर : गोरेवाडा येथील गवळी मोहल्ल्यातील १५ वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. दहा दिवस लोटूनही त्याचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. यातच तो ‘पायाळू’ असल्याने गुप्तधनासाठी त्याचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा परिसरात पसरली आहे. त्यामुळे त्याच्या शोधात असलेले आई-वडील आणखीनच चिंतेत आहेत.
अभिषेक ऊर्फ सुमित शुक्ला (१५) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो गोरेवाडा वस्ती रोटरी क्लब गवळी मोहल्ला येथे राहत होता. त्याचे वडील ओमप्रकाश हे सिक्युरिटी गार्ड आहेत. घरी आई, वडील आणि दोन लहान बहिणी आहेत. गेल्या १४ मे रोजी सुमित घराबाहेर खेळत होता. सायंकाळी ४ वाजता त्याच्या आईने त्याला भाजीपाला आणायला सांगितले. परंतु बराच उशीर झाला तरी तो परतला नाही. मित्रांसोबत खेळत असेल या अपेक्षेनी घरच्यांनी लक्ष दिले नाही. रात्री बराच उशीर होऊनही तो परत आला नाही तेव्हा त्याच्या आई-वडिलांना वस्तीत विचारपूस केली. त्याच्या मित्रांना विचारणा केली, तेव्हा सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो वस्तीतील एका मित्राच्या गायीच्या गोठ्यात खेळत असल्याची माहिती मिळाली. परंतु त्यानंतर मात्र तो कुणालाच दिसला नाही. बराच शोध घेण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात सुमितच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविली. याचे आई-वडीलसुद्धा आपल्या स्तरावर त्याचा शोध घेत आहेत. आज १० दिवस लोटले आहे. परंतु सुमितचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. आपला मुलगा कसा असेल, याची त्यांना चिंता लागलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Abduction for espionage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.