शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 16:48 IST

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

नागपूर : हनुमान चालीसा, महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण ते आता कथित लव्ह जिहाद प्रकरणातून सातत्याने राणा दाम्पत्य सातत्याने चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग यांनी अडीच वर्षात महिन्याला ७ कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहचवले, असा गंभीर आरोप रवी राणांनी केला. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम दिला होता. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यावर जितके गुन्हे दाखल करता येईल, तेवढे खोटे गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले होते, असे रवी राणा म्हणाले.

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मनपा आयुक्तांवर शाईफेक झाली त्यावेळी मी अमरवातीत नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस पाठवून आम्हाला दोन दिवस नजरकैद केलं होतं. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तेव्हा माझ्या सोबत अनेक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं, नवनीत राणांना नजरकैदेत ठेवलं. तसेच, अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारी लावली. कोल्हे हत्या प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही राणा यांनी केला.

आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये एकसुत्री वसुली पथक नेमलं होतं. वसुली पथकाच्या माध्यमातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले, दंगे झाले. कोल्हे यांची हत्या झाली. आज अमरावतीत रोज गुन्हे होतात, अवैधंदे चालतात, हत्या होत आहेत. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्याच्यातून उद्धव ठाकरे यांना पैसा पोहोचवल्याचा दावा राणा यांनी केला आहे. याप्रकरणातील तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत ते आम्ही योग्यवेळी सीआयडीकडे देऊ असंही रवी राणा यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेArti Singhआरती सिंगAmravatiअमरावती