इंधन दरवाढीविरोधात ‘आप’चे ‘धक्का मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:45+5:302021-02-06T04:12:45+5:30

नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आम आदमी पक्षातर्फे ‘धक्का मारो’ आंदोलन करण्यात आले. पंचशील चौक ते व्हेरायटी चौक या मार्गावर ...

AAP's 'push' movement against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात ‘आप’चे ‘धक्का मारो’ आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात ‘आप’चे ‘धक्का मारो’ आंदोलन

नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आम आदमी पक्षातर्फे ‘धक्का मारो’ आंदोलन करण्यात आले. पंचशील चौक ते व्हेरायटी चौक या मार्गावर हाती दुचाकी घेऊन तिला धक्का मारत हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासन व राज्य शासनाने तात्काळ पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२०१४ मध्ये पेट्रोलवरील अबकारी कर ९.२० रुपये इतका होता. आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर प्रति लिटर ३१.८३ रुपये कर लावण्यात येत असून, राज्य शासनाकडून प्रति लिटर २८.९८ रुपये कर आकारणी होते. केंद्र व राज्य सरकार आकारत असलेला अवाजवी कर कमी करावा, अशी मागणी ‘आप’तर्फे लावून धरण्यात आली.

आंदोलनाला देवेंद्र वानखेडे, जगजित सिंग, अमरिश सावरकर, कृतल वेलेकर, आकाश सपेलकर, कविता सिंघल, शंकर इंगोले, नीलेश गोयल, भूषण ढाकूलकर, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, पराग जंगम, मयंक यादव, हरीश गुरबानी, हेमंत बनसोड, प्रमोद नाईक, अंबरिश सावरकर, उमाकांत बनसोड, सचिन पारधी, दीपक भटखारे, निखिल मेंदवडे, संजय जीवतोडे, राजेश तिवारी, जगदीश रोकडे, संजय सिंग, लक्ष्मीकांत दांडेकर, जहांगीर शेख, विशाल पटले, अलका पोपटकर इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: AAP's 'push' movement against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.