शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'आप'ची 'मोदी हटाओ, देश बचाओ'ची हाक, देशभर पोस्टरबाजी

By नरेश डोंगरे | Updated: March 30, 2023 18:11 IST

आंदोलनातून जनजागरण

नागपूर : तोंड उघडायचे असेल तर फक्त माफी मागण्यासाठी उघडा. विरोधात बोलण्यासाठी तोंड उघडले तर कारवाई करून, कारागृहात टाकून गप्प केले जाईल, अशी खतरनाक भूमीका केंद्रातील मोदी सरकारने घेतली आहे. त्याविरोधात आम आदमी पार्टीने 'मोदी हटाओ, देश बचाओ'ची हाक दिली असून, जनजागरण करण्यासाठी देशभर पोस्टरबाजीच्या माध्यमातून आंदोलन करण्याची भूमीका घेतली आहे. आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सीबीआय, ईडी, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरून मोदी सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहे. चांगले काम करणाऱ्या आप सरकारमधील मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन सारख्या मंत्र्यांना कारागृहात डांबण्यात आले. अदानीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करणाऱ्या राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर अपिलात जाण्याची मुदत असताना देखिल तडकाफडकी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व निलंबीत करण्यात आले. शेतकरी, कामगाराचे हित मारले जात आहे आणि कुणी विरोधात तोंड उघडले तर ते अशा पद्धतीने बंद केले जाते. दिल्लीत 'मोदी हटाओ, देश बचाओ'चे पोस्टर लावले म्हणून आपच्या १११ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारविरुद्ध पोस्टरबाजी करून आप तर्फे जनजागरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, आज ३० मार्चपासून देशभर पोस्टर लावले जाणार आहे. मोदी सरकारने या संबंधाने किती जणांवर गुन्हे दाखल करायचे आहे आणि किती जणांना कारागृहात टाकायचे आहे, ते टाकावे, असे पार्टीचे पदाधिकारी जगजित सिंग म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा संयोजक कविता सिंगल तसेच अन्य पदाधिकारी अंबरिश सावरकर, डॉ. शहिल अली जाफरी, अशोक मिश्रा, शंकर इंगोले, महाजन, शाम बोकडे, विशाल वैद्य, पंकज मेश्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAAPआपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूर