सिकलसेल मुक्तीसाठी आमीर खानला साकडे
By Admin | Updated: October 31, 2014 00:49 IST2014-10-31T00:49:04+5:302014-10-31T00:49:04+5:30
‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’

सिकलसेल मुक्तीसाठी आमीर खानला साकडे
सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचा प्रयत्न : जनजागृतीसाठी निवेदन
नागपूर : ‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामधून या आजाराची जनजागृती करण्यात यावी, यासाठी अभिनेते आमीर खान यांना साकडे घातले आहे. सिकलसेल हा आजार १९१०मध्ये निदर्शनास आला. अमेरिका, आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांमध्ये आजाराचा प्रभाव पाहायला मिळाला. मागील १०४ वर्षे होऊनही हा आजार नष्ट होण्यावर औषध उपलब्ध नाही. ‘सिकलसेल’ हा आजार केवळ बाळाच्या जन्मानंतर या एकच माध्यमातून वाढतो. त्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातूनच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला सामाजिक आरोग्य समस्या म्हणून घोषित केले असून, जगातील घातक आजारांच्या श्रेणीत या आजाराचा समावेश केला आहे. १९५२ पासून आजपर्यंत १२ राज्यांमध्ये आढळून आलेल्या या आजाराने १० लाखांपेक्षा जास्त कुटुंबाला अडचणीत आणले आहे. आजार व सर्वेक्षणावर केंद्र शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु, नियंत्रणासाठी ६७ वर्षांनंतरही केंद्र व राज्य शासनाकडून योग्य पावले उचलण्यात आली नाही. आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समस्या व नागरिकांच्या हितासाठी जनजागृती केली जाते. सिकलसेल आजाराबाबतही जनजागृती व्हावी यासाठी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी अभिनेते आमीर खान यांची मुंबईत भेट घेऊन सिकलसेल आजाराविषयीची माहिती दिली. यावर खान यांनी, ‘सिकलसेल माझ्यासाठी नवीन आरोग्य समस्या असून, इतर मार्गांनी माहिती घेईल’ असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)