शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

आजी-माजीमध्ये रंगणार सामना

By admin | Updated: November 12, 2016 02:48 IST

कु णबीबहुल परंतु दलित, तेली, माळी व मुस्लिम अशा सर्व जातींचा कमी अधिक प्रमाणात समावेश

नागपूर : कु णबीबहुल परंतु दलित, तेली, माळी व मुस्लिम अशा सर्व जातींचा कमी अधिक प्रमाणात समावेश असलेल्या प्रभाग ३२ मध्ये निवडणूक अटीतटीची होणार आहे. कुणालीही विजय सोपा नाही. उपमहापौर सतीश होले, नगरसेविका निमिषा शिर्के , राजू नागुलवार, नयना झाडे, दीपक कापसे, सीमा राऊ त, सत्यभामा लोखंडे व किशोर गजभिये अशा आठ नगरसेवकांच्या प्रभागाचा भाग कमी अधिक प्रमाणात या प्रभागात आला आहे. माजी नगरसेवक अशोक काटले, दीपक चौधरी, संदीप गवई, सतीश देऊ ळकर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यास इच्छूक आहे. आरक्षण व आघाडी बिघडल्याने गेल्यावेळी अशोक काटले यांची संधी हुकली होती. यावेळी आरक्षणामुळे उमेदवारी न मिळाल्यास त्यांच्या पत्नी जया या राष्ट्रवादी काँगे्रसकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका नयना झाडे व त्यांचे पती संजय झाडे कामाला लागले आहेत. प्रभाग ३२ मध्ये सतीश होले यांच्या विद्यमान प्रभागातील बजरंगनगर, जवाहर नगर, खानखोजेनगर असा ७५ टक्के प्रभाग आला आहे. परंतु ते प्रभाग ३१ मधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. गेल्यावेळी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीकडून राजू नागुलवार यांना सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी मिळाल्यास ओबीसी महिला गटातून जया काटले निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्या पत्नी मीना कुंटे संधी मिळाल्यास लढतील. गेल्यावेळी संधी हुकलेले काँग्रेसचे सतीश देऊळकर पुन्हा नशीब अजमावण्यास इच्छूक आहेत. काँग्रेसकडून नयना झाडे इच्छूक असून उमेदवारी न मिळाल्यास त्यांचे पती संजय झाडे रिंगणात उतरू शकतात. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांचे विश्वासू भाजपच्या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष संजय ठाकरे प्रभाग ३४ मधून लढणार होते. परंतु आरक्षणामुळे त्यांची या प्रभागातील संधी हुकली आहे. त्यामुळे त्यांनी प्रभाग ३२ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून दावेदारी केली आहे. परंतु भाजपकडून लढण्यासाठी माजी नगरसेवक दीपक चौधरी यांनीही दंड थोपटले आहे. आता भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. विविध संघटनात कार्यरत असलेले दिलीप सूरकर यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. माजी नगरसेवक संदीप गवई दहा वर्षानंतर पुन्हा एकदा या प्रभागातून कमबॅक करण्याच्या विचारात असून अनुसूचित जाती प्रवर्गातून लढण्यास इच्छूक आहेत. याच प्रवर्गातून भाजपतर्फे अभय गोटेकर इच्छूक आहे. ओबीसी महिला गटातून मंगला मस्के यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीतफें या प्रवर्गातून विलास ठाकरे इच्छूक आहे. भाजपकडून सुनील मानेकर, परशु ठाकूूर, गजानन तांबोळी अशी इच्छुकांची गर्दी आहे. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या वजनदार उमेदवारांची यादी बघता भाजपचा कस लागणार आहे. पक्षातर्फे काहींना आधीच तयारीला लागण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच या प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अजनी पोलीस स्टेशनपासून मानेवाडा, अयोध्यानगर, मानेवाडा चौक तर रिजरोड टी पॉर्इंट व मानेवाडा चौकापर्यंत विस्तार आहे. जुना जवाहरनगर वॉर्ड, अयोध्यानगर, बजरंगनगर, ज्ञानेश्वर नगर वॉर्डाचा भाग या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रभागाला जोडण्यात आलेल्या रघुजीनगर प्रभागातून गेल्यावेळी अपक्ष सतीश होले, भाजपचे प्रकाश ठाकरे व राष्ट्रवादीतर्फे अशोक काटले यांनी निवडणूक लढविली होती. होले यांना ७०६१ मते मिळाली होती. ठाकरे यांना ३५३६ तर काटले यांना ३२८० मते मिळाली होती. याच प्रभागातून काँग्रेसच्या निमिषा शिर्के विजयी झाल्या होत्या. त्यांना ४९८०मते तर अपक्ष मंगला मस्के यांना ४९२२ मते मिळाली होती. शिर्के यांचा ५८ मतांनी विजय झाला होता. अयोध्यानगर प्रभागाचा संपूर्ण भाग नवीन प्रभागात आला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीचे राजू नागुलवार, काँग्रेसच्या नयना झाडे विजयी झाल्या होत्या. नागुलवार यांना ५७१६ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे बळवंत जिचकार यांना ५२०७ मते मिळाली होती. मनसेचे प्रमोद हिवरे यांनी १२४० मते घेतली होती. झाडे यांना ६१६८ मते मिळाली होती. भाजपच्या रुपाली सिंग यांना ५७०७ मते मिळाली होती. बिडीपेठ प्रभागाचाही काही भाग या प्रभागाला जोडण्यात आला आहे. या प्रभागातून काँग्रेसचे दीपक कापसे, व राष्ट्रवादीच्या सीमा राऊ त विजयी झाल्या होत्या. कापसे यांना ५५०३ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे दीपक चौधरी यांना ४१६३ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार अजय बुग्गेवार यांना १९७३, अपक्ष संगीता बनाफर यांना २००६ तर अपक्ष श्रीकांंत सातफळे यांना १५०२ मते मिळाली होती. भाजपच्या स्नेहल बिहारे यांना ५१९२ मते मिळाली होती. अपक्ष सविता लोंदासे यांना १७१४ , लोकभारतीच्या मालती मामीडवार यांना ११४७ मते तर बसपाचे वैशाली उंबरकर यांना १२२२ मते मिळाली होती. महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास दोन्ही पक्षात जागांवरुन रस्सीखेच होईल. सर्वसाधारण प्रवर्गातून एक जागा काँग्रेसला तर एक राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी राष्ट्रवादीतून कुणाला संधी मिळणार हे आताच सांगता येणार नाही. परंतु या प्रभागात विद्यामान व माजी नगरसेवकांत अटीतटीचा सामना होणार आहे. अपक्ष उमेदवारांची संख्याही मोठ्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.