आम आदमी पार्टीचे वीज कनेक्शन जोडो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:51+5:302021-03-26T04:09:51+5:30

नागपूर : महावितरणने राजेश बंडे यांच्या घरचा कापलेला वीज पुरवठा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ...

Aam Aadmi Party's power connection connect movement | आम आदमी पार्टीचे वीज कनेक्शन जोडो आंदोलन

आम आदमी पार्टीचे वीज कनेक्शन जोडो आंदोलन

नागपूर : महावितरणने राजेश बंडे यांच्या घरचा कापलेला वीज पुरवठा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता राखून तो हाणून पाडला. वीज पुरवठा कापल्यामुळे बंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, हे विशेष.

राजेश बंडे यानी २४ तारखेला अंगावर रॉकेल ओतून शासकीय कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. वीज बिलाच्या थकबाकीमुळे त्यांचे कनेक्शन कापण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बुधवारी हे पाऊल उचलले होते. दरम्यान, मंगळवारी आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरचा महावितरणने कापलेला वीज पुरवठा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. लाॅकडाऊननंतर महावितरणने थकबाकीदारांचा वीज पुरवठा कापण्याचा धडाका लावला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने कापलेले कनेक्शन पुन्हा जोडून या मोहिमेचा विरोध करण्याचे आपने जाहीर केले आहे. या आंदोलनात गिरीश तितरमारे, प्रदीप पौनीकर, प्रभात अग्रवाल यांच्यासह नागपूर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, कविता सिंघल, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, विनोद गौर, प्रतीक बावनकर, हेमंत पांडे, अक्षय दुपारे, अविनाश पेंढारकर, मनोज बतवे, सुनील कोटांगे, योगेश पराते आदी सहभागी होते.

Web Title: Aam Aadmi Party's power connection connect movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.