शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

By आनंद डेकाटे | Updated: May 4, 2024 18:44 IST

भदंत सुरेई ससाई : शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त २३ ते २५ मे दरम्यान दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल.

स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी यांच्यासह भिक्खू संघ व भिक्खुणी संघ उपस्थित राहतील. समारंभात उपस्थित लहानथोर अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचा संकल्प घेतील. श्रामणेर दीक्षा घेऊन तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार करतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उंटखाना शाखेतील बुद्धिस्ट सेमिनरीत होईल. सात दिवसीय शिबिरादरम्यान भदन्त धम्मसारथी बुद्ध, धम्म व संघ याविषयी मार्गदर्शन करतील.भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भदन्त धम्मसारथी, भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त धम्मविजय, भिक्खूणी संघप्रिया व भिक्खू संघ करुणा, शांती, मैत्री व बुद्धाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन देतील. शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रबुद्ध बागडे आणि गायक-कलावंतांतर्फे ‘प्रबुद्ध हो मानवा’ हा बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम सादर करतील. यासोबतच अंगुलीमाल, आम्रपाली लघुनाट्य व भीम गर्जना नृत्य सादर करतील.

- इच्छुकांनी संपर्क साधाबालकांना श्रामणेर बनविण्याची इच्छा आहे, त्यांच्या पालकांनी इंदोरा बुद्ध विहार व बुद्धिस्ट सेमिनरी, उंटखाना येथे संपर्क साधवा. बालकांच्या डोक्यावरील केस काढून त्यांच्यासाठी काशाय वस्त्र तयार करून ठेवावे, बुद्ध विहारातील भंतेनी बालकांची यादी सादर करावी, असे आवाहन भदन्त ससाई यांनी केले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमाnagpurनागपूर