शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नागभिड-चांदा मार्गावर भयानक रेल्वे अपघात टळला, स्टेशन मास्तरचा अक्षम्य हलगर्जीपणा

By नरेश डोंगरे | Updated: June 25, 2024 22:17 IST

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताची पुनरावृत्ती टळली: लोको पायलटचे काैतुकास्पद प्रसंगावधान

नागपूर : धोक्याचे संकेत मिळताच लोको पायलटने प्रसंगावधान दाखविल्यामुळे नागभिड-चांदा मार्गावर एक भयावह रेल्वे अपघात टळला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशासकीय वर्तुळाला या घडामोडीमुळे जबरदस्त हादरा बसला आहे.

उल्लेखनीय असे की, चुकीचे सिग्नल मिळाल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आणि या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना दोनच दिवसानंतर स्टेशन मास्तरने पुन्हा अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. मात्र, लोको पायलटने प्रसंगावधान राखल्याने हा अपघात टळला अन् अनेकांचे प्राण बचावले.विशेष म्हणजे, या घडामोडीमुळे रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली असली तरी टळलेल्या अपघाताचे वृत्त बाहेर येऊ नये म्हणून कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. मात्र, आज या संबंधाने 'लोकमत' प्रतिनिधीला स्टेशन मास्तर आणि संबंधित लोको पायलटमधील संभाषणाची क्लीप मिळाली आणि त्यामुळेच या धक्कादायक घडामोडीचे वृत्तही उघड झाले.

हाती लागलेल्या माहितीनुसार, गोंदिया मुख्यालयातील लोको पायलट विवेक वंशपाल आपल्या सहकाऱ्यांसह १९ जूनला नागभिड-चांदा फोर्टकडे ट्रेन घेऊन निघाले. ज्या स्टेशनवरून ट्रेन निघते त्या स्टेशन मास्तरकडून समोरच्या ट्रॅकवरचा संपूर्ण अहवाल (कॉशन ऑर्डर) लोको पायलटला दिला जातो. त्यात कुठल्या ठिकाणी काय काम सुरू आहे, तेथे कोणती स्पीड ठेवावी, हे सर्व नमूद असते. याच अहवालाच्या आधारे लोको पायलट ट्रेनच्या स्पीडमध्ये बदल करीत असतो.

केळझर स्टेशन परिसरात त्यांना स्टेशन मास्तरकडून ११ जुनच्या पोजिशनचा कॉशन ऑर्डर तारिख कापून १९ जूनला देण्यात आला. त्यानुसार, लोकोपायलट ९० ते १०० च्या स्पीडने गाडी घेऊन निघाले. जेथे रेल्वे ट्रॅकचे, पुलाचे काम सुरू असते तेथे जास्तीत जास्त रेल्वेगाडीचा वेग ताशी २० ते ३० किलोमिटर असायला हवा. मात्र, स्टेशन मास्तरने दिलेल्या कागदावर असे काहीही नमूद केले नसल्याने ट्रेन सुसाट धावत होती. अचानक ११८६ केएम जवळ त्यांना ट्रॅकवर काही व्यक्ती काम करताना दिसले. त्यामुळे लोको पायलट आणि सहकाऱ्यांना दरदरून घाम फुटला. मोठा अपघात होणार, हे लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवले. ही गाडी अशीच पुढे धावत गेली असती तर पुढेही २ किलोमिटर नंतर मोठा अपघात घडला असता. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे ते सर्व टळले. या नंतर सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करून लोको पायलटने स्टेशन मास्तरला फोन करून या संबंधाने जाब विचारला. त्यांनी तो ऑर्डर आधी एक दिवस अगोदरचा असल्याचे सांगितले. मात्र, लिखित स्वरूपातील ऑर्डरवर ११ तारिख कापून १९ जून करण्यात आल्याचे ठासून सांगितले असता स्टेशन मास्तर 'त-त-म-म' करू लागला.

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताची पुनरावृत्ती टळली१७ जूनला अशाच प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेसवर भरधाव मालगाडी आदळली आणि त्यामुळे भीषण अपघात होऊन डझनभर लोकांना जीव गमवावा लागला. ५० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आणि कोट्यवधींच्या संपत्तीचेही नुकसान झाले. या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना दोनच दिवसांनंतर स्टेशन मास्तरने हा हलगर्जीपणा दाखविला. त्यामुळे नागभीड-चांदा फोर्ट मार्गावरही असाच भीषण अपघात घडला असता. मात्र, लोको पायलटने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे हा भीषण अपघात टळला.

नागपूर ते दिल्ली प्रचंड खळबळ, बाहेर मात्र गोपनियता !दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मुख्यालयापासून तो दिल्ली पर्यंत या प्रकारामुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चाैकशी सुरू करण्यात आली. मात्र, बाहेरच्या कोणत्या व्यक्तीला याबाबत माहिती होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली. मात्र, त्यासंबंधीची एक ऑडिओ क्लीप लोकमत प्रतिनिधीला आज मिळाली. त्यावरून शहानिशा केल्यानंतर या संबंधीची बरिचशी माहिती पुढे आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले आहे. पुढे आम्ही चाैकशी करीत आहोत.नमिता त्रिपाठी-विभागिय व्यवस्थापक, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर.

 

टॅग्स :Accidentअपघात