शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 10:57 IST

नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल

नागपूर : संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागांत काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल; पण देशाच्या उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली येथे सर्वांत आधी सायंकाळी ५.२९ वाजता ते दिसेल. नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल. चंद्र हा ग्रहणातच उगवलेला असेल. तब्बल दोन तास हा सोहळा अनुभवता येणार आहे.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल.

दुपारपासून सुरुवात

अवकाशात चंद्रग्रहणाला दुपारपासूनच सुरुवात होईल. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशातून सायंकाळी ४.२३ वाजता चंद्र क्षितिजावर आल्यानंतर खग्रास दिसेल. ईशान्य भागात ग्रहण ९८ टक्के आणि ३ तास दिसेल. त्यानंतर, ते खंडग्रास होण्यास सुरुवात होईल.

कुठे किती वाजता चंद्रग्रहण

गडचिरोली - सायं. ५.२९ वा.नागपूर - सायं. ५.३२ वा.चंद्रपूर - सायं. ५.३३ वा.यवतमाळ - सायं ५.३७ वा.अकोला - सायं ५.४१ वा.जळगाव - सायं. ५.४६ वा.औरंगाबाद - सायं. ५.५० वा.नाशिक - सायं. ५.५५ वा.पुणे - सायं. ५.५७ वा.मुंबई - सायं ६.०१ वा.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र