शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छोटी चूक महागात पडू शकते; गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:55 IST

Nagpur : घरगुती गॅस वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत अनेकांना दुखापती होणे, प्रसंगी काहींचा जीव जाणे अशा घटना समोर येत असतात. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घरगुती गॅस वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक असते. गॅस सिलिंडरबाबत होणारी थोडीशी बेपर्वाई मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकते. नागपूर शहरात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत अनेक नागरिक जखमी होण्याच्या, तर काही प्रसंगी जीव जाण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गॅस सिलिंडर हाताळताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घडणाऱ्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

गॅस लिकेजच्या तक्रारी!

जुना झालेला पाइप, खराब झालेले रेग्युलेटरचे वॉशर किंवा शेगडीच्या बर्नरमधील बिघाडामुळे गळती होते. गॅस एजन्सीकडून वेळोवेळी उपकरणांची तांत्रिक तपासणी करून घेतल्यास गळतीच्या सततच्या तक्रारींपासून सुटका मिळू शकते आणि अपघात टाळता येतात.

खबरदारीचे नियम काय !

नेहमी आयएसआय मार्क असलेलाच रबरी पाइप वापरावा आणि तो दर दोन वर्षांनी बदलावा. गॅसचा वापर झाल्यानंतर रेग्युलेटर बंद करणे, पाइपची नियमित तपासणी करणे आणि गळतीचा वास आल्यास तातडीने खिडक्या उघड्या करून वीज उपकरणे बंद करणे, यांसारख्या साध्या नियमांचे पालन केल्यास मोठ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.

गॅस सिलिंडर स्फोटाची कारणे ?

सिलिंडरचा स्फोट मुख्यत्वे गॅस गळती होऊन आजूबाजूला साचलेल्या गॅसचा आगीशी संपर्क आल्याने होतो. तसेच, गॅस शेगडीजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवणे किंवा गळती असताना विजेचा स्विच बोर्ड वापरल्याने निर्माण होणाऱ्या ठिणगीमुळे भीषण स्फोट होऊ शकतो.

घरात गॅसचा सतत वास ?

जर घरात शिरल्याबरोबर गॅसचा विशिष्ट उग्र वास येत असेल, तर समजावे की सिलिंडर, रेग्युलेटर किंवा पाइपमधून गळती होत आहे. अशा वेळी घाबरून न जाता शांत राहून त्वरित सुरक्षा उपाय योजने गरजेचे आहे. कारण थोडासाही उशीर मोठ्या आगीचे कारण ठरू शकतो.

लिकेज आहे असे वाटल्यास...

गॅस लिकेज झाला असे १ वाटल्यास घराची खिडक्या, दारे त्वरित उघडावीत. लिकेज असल्यास वास येतो. सगळ्यात आधी रेग्युलेटर चेक करा. तो सुरू असेल तर लगेच बंद करा. गॅसच्या वासाची शंका आली तर काडीपेटी लावू नका. दिवा जळत असेल तर तो आधी बंद करावा. सिलिंडरचे बटन बंद करावे. गॅस कुठून लिकेज होतो ते तपासून घ्या, आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधा.

English
हिंदी सारांश
Web Title : Small Gas Leakage Mistakes Can Be Costly; Complaints are Rising!

Web Summary : Gas leaks can cause fires, injuries, and fatalities. Safety measures are vital when using gas cylinders. Faulty equipment and negligence are primary causes. Regular maintenance, using ISI-marked pipes, and immediate action upon detecting leaks are crucial to prevent accidents.
टॅग्स :nagpurनागपूर