शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावरून सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण

By नरेश डोंगरे | Updated: June 6, 2024 17:14 IST

Nagpur : आई-वडील नागपूर शहरात भीक मागून करतात उदरनिर्वाह

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका गरीब दांपत्याला वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्याशी सलगी साधल्यानंतर तरुण तरुणीने सहा महिन्याच्या शिशुचे अपहरण केले. गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ज्या शिशुचे अपहरण झाले त्याचे आई-वडील नागपूर शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.

बुधवारी त्यांना एक तरुण-तरुणी भेटले. तुम्हाला चांगला रोजगार मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्या दोघांनी या भिक्षेकरी दांपत्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्या दोघांना शेगावला जाऊ, असे म्हणून रेल्वे स्थानकावर आणले. इथे भिक्षेकरी दांपत्याचे भांडण झाले. त्यानंतर ते फलाट क्रमांक चार वर झोपले. सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांना आपले बाळ दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली.  रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फलाट क्रमांक चार वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तरुण-तरुणी त्या बाळाला घेऊन संत्रा मार्केटकडच्या गेटने पळून गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची वार्ता पोहोचताच सर्वत्र खळबळ उडाली. रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी रेल्वे स्थानक गाठून घटनेची माहिती घेतली. बाळ आणि त्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या चमू वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आल्या असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर