शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील ओढणीने घेतला तरुणीचा जीव; वहिनीसह भाचा थाेडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2023 22:23 IST

Nagpur News भाच्याला दवाखान्यात नेत असताना तरुणीच्या गळ्यात व चेहऱ्याला बांधलेली ओढणी दुचाकीच्या समाेरच्या भागात अडकली आणि तिघेही खाली काेसळले. यात तरुणीच्या गळ्याला ओढणीचा फास लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

नागपूर : भाच्याला दवाखान्यात नेत असताना तरुणीच्या गळ्यात व चेहऱ्याला बांधलेली ओढणी दुचाकीच्या समाेरच्या भागात अडकली आणि तिघेही खाली काेसळले. यात तरुणीच्या गळ्याला ओढणीचा फास लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, भाचा व वहिनी थाेडक्यात बचावले. ही घटना कामठी (नवीन) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी (रडके) शिवारात नुकतीच घडली.

वैष्णवी रामहरी लाडस्कर (१७, रा. अजनी रडके, ता. कामठी) असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवीच्या भावाचा दीड वर्षाचा मुलगा आजारी असल्याने ती साेमवारी (दि. ६) सकाळी त्याला घेऊन एमएच-४०/एस-२०६४ क्रमांकाच्या दुचाकीने कामठी शहरात येत हाेते. भाचा व तिची वहिनी स्वाती (२५) मागे बसली हाेती तर ती दुचाकी चालवित हाेती. गावापासून काही दूर आल्यावर तिने चेहरा व गळ्याला बांधलेल्या ओढणीचा काेपरा तिच्या दुचाकीच्या पुढच्या भागात अडकला. त्यामुळे ताेल गेल्याने तिघेही खाली काेसळले.

यात तिच्या गळ्याला ओढणीचा फास अडकल्याने ती बेशुद्ध पडली. मात्र, दाेघांनाही कुठलीही दुखापत झाली नाही. वहिनीने घरच्यांना सूचना देत तिला सुरुवातीला कामठी शहरातील हाॅस्पिटलमध्ये केले. त्यानंतर तिला नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे साेमवारी (दि. १३) रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू