शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

सदर उड्डाणपुलाला जोडून संविधान चौकापर्यंत जोडला जाणार नवा पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:23 IST

वाहतूककोंडी संपवण्यासाठी नवा उपाय : बांधकामासाठी ३४ कोटींचा खर्च येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिझाइनमधील त्रुटीमुळे संविधान चौकाकडे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) चुकीच्या पद्धतीने उतरणाऱ्या सदर उड्डाणपुलाच्या समस्येवर आता जो उपाय सुचवण्यात आला आहे, तो आणखी गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. सदर उड्डाणपुलाला लिबर्टी टॉकीजजवळून एक नवीन पूल जोडला जाईल, जो एलआयसी चौक, कस्तुरचंद पार्कमार्गे संविधान चौकाशी जोडला जाईल. सुमारे ३४ कोटी रुपये खर्चुन बांधल्या जाणाऱ्या ६५० मीटर लांबीच्या या पुलामुळे सुलभतेपेक्षा अडचणीच अधिक निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कस्तुरचंद पार्क मैदानावरून कामठी रोडवरील मेट्रो पुलाखालून हा नवीन पूल केपी ग्राउंडच्या दिशेने वळेल. त्यामुळे त्या रस्त्यावरून बस किंवा ट्रक कदाचित जाऊ शकणार नाहीत. सूत्रांच्या मते, हा पूल बांधण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे.

एलआयसी चौकात पुलाची प्रस्तावित उंची ३.६ मीटर असल्यास बस व मध्यम आकाराचे ट्रक तेथून जाऊ शकणार नाहीत. एलआयसी चौकातून उतरणारा रॅम्प कस्तूरचंद पार्कमध्ये प्रवेश करेल आणि सध्याच्या रस्त्याच्या समांतर जाईल, मेट्रो स्टेशन पार करेल आणि शेवटी संविधान चौकाला जोडेल. संविधान चौकात कस्तुरचंद पार्कसमोरील ट्रॅफिक आयलँड हलवावे लागेल. प्रस्तावित पुलाची रुंदी ९ मीटर असून दोन लेन असतील. काही भागांत ही रुंदी ११ मीटर असेल. एनआयटी बिल्डिंग, एलआयसी चौक आणि मेट्रो स्टेशनखाली पिलर उभारण्यात येतील. सध्या हे काम सुरू आहे. नवीन आर्म तयार झाल्यानंतर सदर उड्डाणपुलाला तीनच्या ऐवजी चार एंट्री आणि एग्झिट पॉइंट्स असतील. प्रस्तावित नवीन आर्मसाठी कस्तुरचंद पार्कची काही जमीन संपादित करावी लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियेस सुमारे चार महिने लागू शकतात. 

कस्तुरचंद पार्कची जमीन संपादित करणे सोपे असेल का?ग्रेड-१ हेरिटेज साइट असलेल्या कस्तुरचंद पार्कची जमीन संपादित करणे सोपे नाही. यूडीसीपीआर नियमानुसार, अशा कोणत्याही बदलासाठी प्रथम हेरिटेज समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. यासाठी हेरिटेज इम्पॅक्ट असेसमेंट, जनतेच्या हरकती आणि सविस्तर तांत्रिक कारणांची गरज असते; जेणेकरून हे सिद्ध करता येईल की, या प्रकल्पामुळे पार्कच्या ऐतिहासिक स्वरूपाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

सदर उड्डाणपुलाचा संपूर्ण वापर होऊ शकलेला नाहीकस्तुरचंद पार्कच्या दिशेने उतरण्यातील अडचणीमुळे अनेक वाहनचालक या पुलाचा वापर टाळतात. सुमारे २१९ कोटी रुपये खर्चुन बांधलेला ३.९६ किमी लांब सदर उड्डाणपूल अजूनही पूर्ण क्षमतेने वापरात आलेला नाही. नवीन ६५० मीटर लांब रॅम्प जोडल्यावर पुलाची एकूण लांबी ४.६ किमी होईल. भोपाळमधील ९० अंश वळणाचा पूल चर्चेत होता. सदर उड्डाणपुलाच्या आर्मचे प्रस्तावित वळणही तत्सम असल्याचे सांगितले जात आहे. जाणकार या प्रस्तावित नवीन पुलाच्या डिझाइनला अव्यावहारिक मानत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर