शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात किरकोळ वाद पेटला, गुंडाची घराजवळच हत्या

By योगेश पांडे | Updated: April 26, 2024 16:42 IST

Nagpur : अजनीतील हावरापेठेत खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांअगोदर झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी पाचहून अधिक आरोपींनी एका कुख्यात गुंडाची हत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हावरापेठेत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

अमोल सुरेशराव मेहर (३६, हावरापेठ, गल्ली क्रमांक दोन) असे मृतकाचे नाव आहे. अमोल हा हावरापेठेतील कुख्यात गुंड होता व त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. काही काळापासून तो प्रॉपर्टी डिलिंगची कामे करत होता. दोन दिवसांअगोदर त्याचा वस्तीजवळ राहणाऱ्या रजत उर्फ लल्ला किशोर शर्मा (३०, हावरापेठ) याच्याशी किरकोळ गोष्टीवरून वाद झाला होता. गुरुवारी अमोल त्याच्या मित्रांसोबत वर्धा जिल्ह्यातील आंजीगाव येथील साईट पाहण्यासाठी गेला होता. तेथेच त्याची सासरवाडी असून तेथून वांगे घेऊन तो घरी परतला. घरच्यांना वांगे देऊन तो रात्री साडेदहा वाजता मंगेश नावाच्या मित्राकडे परत केला. मंगेशच्या घराजवळच रजत तसेच त्याचे साथीदार सुनयन अमरीत खर्चे (३२, रतन नगर), नितेश संजय मस्के (२८, हावरापेठ), कार्तिक किशोर शर्मा (२०, हावरापेठ) व इतर सहकाऱ्यांनी अमोलला घेरले. त्यांनी दोन दिवसांअगोदरच्या वादावरून त्याला शिवीगाळ सुरू केली. अमोलदेखील आक्रमक झाला. हे पाहताच आरोपींनी त्याच्यावर चाकू, तलवारींनी वार केले. मंगेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. वस्तीतील लोकांनी अमोलचे वडिल सुरेशराव यांना माहिती दिली. त्यांनी धाव घेतली असता आरोपींनी त्यांनादेखील खाली पाडले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. अमोलला मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री रजत, सुनयन व नितेश यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

परिसरात तणावअमोलच्या हत्येनंतर हावरापेठ परिसरात तणावाचे वातावरण होते. अमोलविरोधात अगोदर अनेक गुन्हे दाखल होते. एका फायरिंगच्या प्रकरणानंतर तो चर्चेत आला होता. मध्यरात्रीनंतर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. पोलीस या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज शोधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर