शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

सार्वजनिक बांधकाम विभागाला जोरदार झटका : नागपूर विधानभवनाच्या विस्ताराचे काम विभागाकडून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:46 IST

Nagpur : देशात पहिल्यांदाच महामंडळाकडे विधानभवन उभारणीची जबाबदारी !

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : 'पोस्टिंग, ट्रान्स्फर, प्रमोशन'च्या गर्तेत अडकलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जोरदार झटका बसला आहे. नागपूर विधानभवनाच्या विस्ताराचे काम या विभागाकडून काढून घेण्यात आले असून, आता हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपविण्याचा निर्णय झाला आहे. विधानभवनासारख्या संवेदनशील इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी महामंडळाकडे दिल्याची ही देशातील कदाचित पहिलीच वेळ आहे.

संभाव्य विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर, ८०० सदस्यांसाठी बैठकव्यवस्था असलेले नवे विधानभवन उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये विधानसभेतील ५०० आणि विधान परिषदेसाठी ३०० सदस्यांची बैठक व्यवस्था प्रस्तावित असून, एक सेंट्रल हॉलही उभारण्यात येणार आहे.

यासाठी शासकीय मुद्रणालयाच्या १६,१८२ चौ. मी. जमिनीपैकी ९,६७० चौ.मी. जमीन विधानमंडळ सचिवालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याच्या मोबदल्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या १७,६३० चौ.मी. जमिनीपैकी ९,६६० चौ.मी. जमीन मुद्रणालयाला देण्याचे निर्देश देण्यात आले. यासंदर्भात दोन्ही विभागांमध्ये सुरू असलेला वाद महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपामुळे मिटविण्यात आला.

दरम्यान, २६ मे रोजी विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्याला मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र लिहून संबंधित सर्व दस्तावेज मागवले आहेत. पत्रात नमूद केले आहे की, २६ मे रोजीच्या बैठकीत विधानसभाध्यक्षांनी याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र, बांधकाम विभाग सध्या आपल्या अखत्यारितील इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू ठेवणार आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागnagpurनागपूरVidhan Bhavanविधान भवन