शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मावशीला बोलवायला रस्त्यावर गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याला कारने चिरडले

By योगेश पांडे | Updated: April 29, 2024 17:45 IST

Nagpur : लग्नाच्या रिसेप्शनला गेलेल्या कुटुंबावर आघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका लग्नाच्या स्वागत समारंभात गेलेल्या दांपत्याला त्यांचा पाच वर्षीय चिमुकला अपघातात गमवावा लागला. मावशीला बोलविण्यासाठी लॉनमधून रस्त्यावर गेलेल्या चिमुकल्याला रॉंगसाईडने आलेल्या भरधाव कारने चिरडले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चिरायू अनोद पवार (५, राजीवनगर, वडधामना) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे आईवडील त्याचा मोठा भाऊ लक्ष्य याच्यासह नातेवाईकांच्या घरच्या रिसेप्शनसाठी वेळाहरी मार्ग, बेसा येथील करण लॉनमध्ये गेले होते. त्याचे पालक नातेवाईकांसोबत बोलत असताना चिरायू हा त्याच्या मावशीला आवाज देण्यासाठी बाहेर गेला. त्यावेळी एमएच ४९ बीआर ४९१२ ही कार रॉंग साईडने वेगात आली व चिरायू त्याच्याखाली आला. कारचालक योगेश दामोदर मोहाडीकर (४२, शिव एलाईट टाऊनशीप, शंकरपूर) याने करकचून ब्रेक दाबले. मात्र चिरायू गंभीर जखमी झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच एकच हलकल्लोळ उडाला. त्याच्या छाती व डोक्याला गंभीर मार बसला होता. त्याचे वडील व मामा त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

रिसेप्शनमध्ये पसरली शोककळालॉनच्या बाहेर झालेल्या अपघाताची माहिती आत कळताच सर्वांनी बाहेर धाव घेतली. समोरील दृश्य पाहून अनेक जण संतापले व कारचालकाला घेरण्यात आले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही क्षणांअगोदर हसताखेळता असणारा व बोबडे बोल बोलत सर्वांशी बोलणारा चिरायू आपल्यात नाही ही कल्पनाच नातेवाईकांना सहन होत नव्हती.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू