शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अंबाझरी तलावात सापडला पाण्यावर तरंगला पाच किलाेचा दगड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:55 IST

दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.

निशांत वानखेडेनागपूर :

दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत असून, हा दगड कुतूहलाचा विषय ठरला आहे. नागपूरचे स्विमिंग काेच संजय बाटवे अंबाझरी तलावावर काेचिंगसाठी गेले हाेते. साफसफाई करताना एक दगड अचानक तलावात पडला. मात्र, हा दगड बुडण्याऐवजी तरंगायला लागला. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ताे दगड पुन्हा काढला आणि दुसऱ्या भागात फेकला. काही वेळ बुडात जाऊन ताे पुन्हा वर आला. त्यांनी या दगडाचा व्हिडीओ बनविला आणि मित्रांच्या ग्रुपवर टाकला. पाहता-पाहता तो वाऱ्यासारखा पसरला आणि दगड पाहण्यासाठी गर्दी जमू लागली. दगडाची तुलना थेट रामसेतूशी जाेडली गेली. 

वालुकामय खडक की सिमेंटमिश्रीत दगड? स्वत: भूगाेल विषयात एमए असलेल्या बाटवे यांना मात्र फारसे आश्चर्य वाटले नाही. पाच-सहा किलाे वजनाचा हा दगड वालुकामय किंवा सिमेंटमिश्रीत खडक असू शकताे. वालुकामय दगडाच्या आत कालांतराने पाेकळी निर्माण हाेते व त्यात गॅस भरल्यामुळे कधी-कधी हे खडक पाण्यावर तरंगतात.हा सिमेंटमिश्रीत दगडही असू शकताे. छठपूजेसाठी कुणीतरी आणला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

प्रत्यक्ष दगड पाहिल्याशिवाय काही सांगणे शक्य नाही. कोराडी परिसरात रांगाेळी तयार करण्यासाठी उपयाेगात येणारे खडक आहेत. हे खडक काही काळ पाण्यावर तरंगत राहू शकतात. रामसेतूमुळे चर्चेत असलेला ‘पुमाइस’ प्रकारचा दगड किंवा खडक नागपूर परिसरात आढळत नाही. - आर.एच. चव्हाण, अधिकारी, भूगर्भ सर्वेक्षण विभाग

टॅग्स :nagpurनागपूर