कपड्यांचे दुकान फोडले, लॉकरमधील दोन लाख पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: November 14, 2023 15:56 IST2023-11-14T15:56:31+5:302023-11-14T15:56:42+5:30
दुकानाचे लोखंडी लॉकर तुटलेले दिसले. लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये त्यांना दिसले नाही.

कपड्यांचे दुकान फोडले, लॉकरमधील दोन लाख पळविले
नागपूर : कपड्यांचे दुकान फोडून लोखंडी लॉकरमधील दोन लाख रुपये अज्ञात आरोपीने पळविल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अजित विवेक बनोदे (वय २३, रा. सुर्वे ले आऊट, छोटा ताजबाग) यांचे रघुजीनगर चांदनी बारच्या बाजुला सपना टेक्सटाईल्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. रविवारी १२ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० वाजता ते आपले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सोमवारी १३ नोव्हेंबरला ते सकाळी १०.३० वाजता दुकान उघडून आत गेले असता त्यांच्या दुकानाचे लोखंडी लॉकर तुटलेले दिसले. लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये त्यांना दिसले नाही.
अज्ञात आरोपीने मध्यरात्री २ ते २.४५ दरम्यान त्यांच्या दुकानाच्या बाल्कनीची ग्रील तोडून आत प्रवेश करून रोख दोन लाख रुपये चोरून नेले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.