शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

 मध्यरात्री क्लबमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी

By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 17:14 IST

Nagpur News विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या ‘डाबो किचन ॲंड क्लब’मध्ये परत एक राडा झाला व नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी करण्यात आली.

योगेश पांडे नागपूर : विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या ‘डाबो किचन ॲंड क्लब’मध्ये परत एक राडा झाला व नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी करण्यात आली. बाऊन्सर्सने भांडणाऱ्या ग्राहकांना बाहेर काढल्यानंतर रस्त्यावर मारामारी सुरू होती. पोलिसांच्या गस्ती पथकाने जाऊन हा प्रकार बंद केला. मध्यरात्री सव्वा ते दीड या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

राघवेंद्र अतुल मौर्य (३१) हा तरुण सहकाऱ्यांसह डाबोमध्ये गेला होता. नाचत असताना त्याचा धक्का रमण सवाईथूल (३५) याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शाब्दिक वाद वाढल्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. रमणसोबत असलेले सलमान खान (जाफरनगर), उमर शेख व फैजान यांनी राघवेंद्रला घेरले व मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच त्यांना बाहेर काढण्यात आले. क्लबसमोरील रस्त्यावर हे सगळे जण हाणामारी करत होते. याची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सोनेगाव पोलीस ठाण्याचे गस्तीपथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी सर्वांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता शिवीगाळ व हाणामारी सुरूच होती. यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत सर्वांना ताब्यात घेतले. राघवेंद्रने आपल्याला जाणुनबुजून दोन ते तीन वेळा धक्का दिला व शिवीगाळ केली असा दावा रमणने केला. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात केवळ सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याचे कलम लावत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी