शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक

By योगेश पांडे | Updated: February 7, 2025 08:41 IST

Whatsapp number blocked after digital arrest case increase: देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली आहेत.

-योगेश पांडे नागपूर : देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली असून, ‘आयफोरसी’च्या (इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर) माध्यमातून देशातील सायबर गुन्हेगारांच्या  ७७ हजारांहून अधिक क्रमांकाचा शोध लावून त्यांचे व्हॉट्सॲप ब्लॉक केले आहे. तसेच ‘स्काइप’च्या हजारो खात्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. 

पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टममधील अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगार नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ करतात. 

व्हिडीओ कॉलिंगसाठी ‘स्काइप’चा वापर

या स्कॅम्समधील व्हॉइस व व्हिडीओ कॉलिंगसाठी सायबर गुन्हेगार प्रामुख्याने व्हॉट्सॲप कॉलिंग व स्काइपचा उपयोग करतात. 

‘आयफोरसी’ने मागील काही महिन्यांत आलेल्या तक्रारींच्या तपासादरम्यान सायबर गुन्हेगारांच्या ७७ हजार १९५ व्हॉट्सॲप क्रमांकांचा शोध लावला व त्यांना ब्लॉक केले. याशिवाय ३ हजार २५५ स्काइप खातीदेखील ब्लॉक केली आहेत. 

सव्वानऊ लाख बँक खात्यांवर हंटर

ऑनलाइन गंडा घातल्यानंतर सायबर गुन्हेगार विविध बँक खात्यात रक्कम वळती करतात. यातील बहुतांश बँक खाती ही गरीब लोकांकडून भाडेतत्त्वावर व नकळतपणे घेतलेली असतात.या खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड सर्व सायबर गुन्हेगारांच्या टोळीकडेच असते. ‘लोकमत’ने ही ‘मोडस ऑपरेंडी’ मागील वर्षीच बाहेर आणली होती. 

या खात्यांना शोधण्यासाठी ‘सीएफएमसी’ची (सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर) स्थापना केली असून त्यात मोठ्या बँका, वित्तीय संस्था, पेमेंट अग्रिगेटर्स, टेलिकॉम कंपन्या, आयटी तज्ज्ञ व विविध राज्यांच्या एजन्सीजचे प्रतिनिधी सहभागी आहेत. आतापर्यंत  ‘सीएफएमसी’ने ९.२३ लाख ‘म्युच्युअल अकाउंट्स’चा शोध लावला आहे.  

सात लाखांहून अधिक सिमकार्डदेखील ब्लॉक 

देशभरातील सात लाखांहून सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत, तर २.०८ लाख आयएमईआय क्रमांकांचा शोध लावत ते मोबाइलदेखील ब्लॉककेले आहेत. 

सायबर गुन्हेगारांकडून एकाच वेळी हजारो सिमकार्डचा उपयोग करण्यात येत असतो. 

हे आहेत डिजिटल अरेस्ट स्कॅमचे ‘हॉटस्पॉट’

मेवात, जामतारा, अहमदाबाद, हैदराबाद, चंडीगड, विशाखापट्टणम, गुवाहाटी येथे डिजिटल अरेस्ट स्कॅमचे हॉटस्पॉट्स आहेत. या हॉटस्पॉट्ससाठी सात ‘जॉइंट सायबर कोऑर्डिनेशन टीम्स’ स्थापन करण्यात आल्या आहेत.     

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीHome Ministryगृह मंत्रालय