मास्क न वापरणाऱ्या ९९ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:15+5:302021-03-17T04:09:15+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ९९ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ...

99 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या ९९ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या ९९ नागरिकांना दंड

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ९९ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३५,९८७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६३ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ४२, धरमपेठ ५, हनुमाननगर २, धंतोली ७, नेहरूनगर ५, गांधीबाग ३, सतरंजीपुरा ५, लकडगंज ८, आशीनगर १०, मंगळवारी ११ आणि मनपा मुख्यालयातील एकाविरुद्ध ही कारवाई पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: 99 citizens fined for not wearing masks