लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी ११ दुकान प्रतिष्ठानांवर कारवाई करून ९५ हजारांचा दंड वसूल केला. धंतोली येथील मेहाडिया चौकातील हॉटेलने कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हॉटेल सील करण्यात आले होते. त्यांच्याकडून २० हजार रुपये दंड वसूल केल्यानंतर सील काढण्यात आले. तसेच नरेंद्रनगर येथील जिनियस हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी यांच्याकडील जैविक कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळल्याने त्यांच्यावर ३० हजार रुपये दंड करण्यात आला. पथकांनी ७१ प्रतिष्ठान व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली.