शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

95 मनिटांचं ऑपरेशन, नागपूरच्या एचपीसीएलमध्ये दहशतवादी शिरतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 20:08 IST

३४ कमांडोजनी केली फायरिंग : एक दहशतवादी ठार, दुसरा जेरबंद : दीड तास चालले ऑपरेशन : परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण

नागपूर : वर्धा मार्गावरील खापरी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या एलपीजी बॉटलींग प्लांटमध्ये दोन दहशतवादी शिरल्याची बातमी पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळी १०.५५ ला मिळाली अन पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. ३४ कमांडोचा ताफा आणि पोलीस अधिकारी अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. कथित दहशतवाद्यांनी एचपीसीएलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंधक बनवून ठेवले होते. कमांडोजनी एचपीसीएल परिसराचा ताबा घेतला. तब्बल ९५ मिनिटे विशेष ऑपरेशन राबवून क्यूआरटी कमांडोजनि एकादहशतवाद्याचा खात्मा केला. तर दुसऱ्याला जिवंत पकडले. आतमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुक्तता करण्यात आली. ऑपरेशन सक्सेसचा मेसेज नियंत्रण कक्षाला देण्यात आला आणि पावणेदोन तासापासून खापरी परिसरात सुरु असलेली कारवाई थांबली.

एचपीसीएल डेपोमध्ये दहशतवादी शिरल्याच्या वृत्ताने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. त्यामुळे आजूबाजूची मंडळीनी या भागात गर्दी केली होती. पत्रकारांनीही नियंत्रण कक्षाला फोन करून शहानिशा करून घेतली. ही मॉकड्रील असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या पोलीस निरीक्षक मांडवधरे, शीघ्र कृती दलाचे उपनिरीक्षक केदारे आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सकाळी ११.१५ ते दुपारी १२ वाजून ५०  मिनिटांपर्यंत हे ऑपरेशन राबविले.

सतर्कता तपासण्यासाठीअचानक अशी काही घटना घडल्यास पोलीस किती सतर्क आहेत, हे तपासण्यासाठी वेळोवेळी अशा मॉकड्रिल वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात. त्यासाठी एचपीसीएल प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आधीच बोलणी झाली होती.

मोठी गर्दी, वाहतूक वळविलीएचपीसीएलमध्ये ऑपरेशन सुरू असताना खापरी भागातील वाहतूक काही वेळेसाठी दुसरीकडून वळविण्यात आली होती. तर,एसपीसीएलमध्ये दहशतवादी शिरल्याच्या वृत्ताने या भागातील नागरिकांत घबराट निर्माण झाली होती.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसMumbaiमुंबईterroristदहशतवादी