९.३० लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:46+5:302021-03-17T04:08:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : पाेलिसांच्या पथकाने निमजी (खदान) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाडी टाकून एकूण ९ लाख ३० हजार ...

९.३० लाखाचा मुद्देमाल जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पाेलिसांच्या पथकाने निमजी (खदान) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाडी टाकून एकूण ९ लाख ३० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात १० जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, चार महिला आराेपींचा समावेश आहे. ही कारवाई साेमवारी (दि. १५) दुपारी करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींमध्ये कामेश ज्ञानेश्वर गाेरामन (वय २६), मधुहरी पवार (७०), दिनेश मधू पवार, लईदास पवार (३५), अमित मधू पवार (२५), चुन्नीलाल चतरू पवार (६५) यांच्यासह चार महिलांचा समावेश आहे. या चारही महिला आराेपींच्या नातेवाईक आहेत.
निमजी (खदान) शिवारात काही नागरिक माेहफुलाची माेठ्या प्रमाणात दारू काढत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या शिवाराची पाहणी केली आणि तिथे दारूभट्ट्या आढळून येताच धाडी टाकल्या. यात पाेलिसांनी दारू काढणाऱ्या व विकणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून ५,८०० लिटर माेहफुलाची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन (सडवा), २,७२० लिटर माेहफुलाची दारू व इतर साहित्य जप्त केले. संपूर्ण दारूसाठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला असून, या कारवाईत एकूण ९ लाख ३० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक खडसे, मुंडे, मेश्राम, सहायक फाैजदार बनाफर, हवालदार सावध, मन्नान नाैरंगाबादे, श्रीकांत बाेरकर, रवी मेश्राम, नीलेश उईके, भुवन शहाणे, अश्विनी भाेयर यांच्या पथकाने केली.