शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तोतलाडोहात ९० टक्के जलसाठा : २०१३ नंतर प्रथमच प्रकल्प भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:35 IST

मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे.

ठळक मुद्देजलसाठा पुन्हा वाढल्यास पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने पेंच व कन्हान नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. २०१३ मध्ये मध्य प्रदेशात चांगला पाऊ स झाला होता. त्यावेळी तोतलाडोहातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच हा प्रकल्प पुन्हा भरला आहे.तोतलाडोह प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा झाल्यास प्रकल्पातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तोतलाडोह ते नवेगाव खैरी(पेंच) प्रकल्पाचे अंतर ३० किलोमीटर आहे. तोतलाडोतून सोडलेले पाणी तीन तासानंतर या प्रकल्पात पोहचेल. नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या १०२.९८ दलघमी जलसाठा आहे. तो एकू ण क्षमतेच्या ४५.०६ टक्के आहे.रस्त्यांवर पाणी साचलेमंगळवारी सायंकाळी ४.४५ नंतर नागपूर शहर व परिसरात चांगला पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले होते. परंतु नागपूर विमानतळ परिसरात जोराचा पाऊ स न झाल्याने शहरातील पावसाची नोंद झाली नाही. हवामान विभागाने ७ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. शाळा -महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र या तारखेला पाऊ स आला नाही. मंगळवारी पावसाने पुन्हा जोर पकडला. पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरात चांगला पाऊ स झाला. शहराच्या इतरही भागात पाऊ स पडला पण त्यात जोर नव्हता. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत नागपूर शहरात १.६ मि.मी. पावासाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ व १२ तारखेला चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे.अंबाझरी, गोरेवाडा काठोकाठ भरले 

नागपूर शहरात मंगळवारपर्यंत ९८१ मि.मी. पाऊ स पडला. परंतु यंदाच्या पावसाळ्यात अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाले नाही. मात्र मंगळवारी दोन्ही तलाव काठोकाठ भरले. जोराचा पाऊ स झाल्यास गोरेवाडा व अंबाझरी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गोरेवाड्याची पाणी पातळी ३१४.५० मीटर झाली आहे. या प्रकल्पाची सर्वाधिक पाणी पातळी ३१५.६५ मीटर आहे. तर अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटच्या भिंतीच्या काठापर्यत पाणी आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी