शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ८८ शाळा धोकादायक, पावसाळा आला तरी दुरुस्तीचा पत्ता नाही

By गणेश हुड | Updated: June 22, 2023 16:22 IST

धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे

नागपूर :जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात.   शाळांची गुणवत्ता सुधारावी. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दुसरीकडे जि.प.च्या तब्बल ८८ शाळा धोकादायक आहेत. या शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. अशा शाळांमध्ये आपली मुले कशी पाठवावीत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत खास काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी प्राथमिक सुविधांची अनेक ठिकाणी वानवा आहे. काही धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. नादुरुस्त शाळा दुरुस्तीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून अपेक्षित प्रमाणात निधी प्राप्त होणे आवश्यक आहे. तो निधी उपलब्ध होत नसल्याने नादुरुस्त शाळांची दुरुस्ती रखडली आहे. त्यात अधिकारी कमालीचे सुस्त असल्याने कामाला गती मिळण्याची शक्यता दिसत नाही.

कळमेश्वर तालुक्यातील ९० वर्गखोल्या जीर्ण

कळमेश्वर तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी ३२८ वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ९०  वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. १०३ वर्गखोल्यांना दुरुस्तीची गरज आहे. तर  ५६  वर्गखोल्या  नव्याने बांधण्याची गरज आहे. सर्व शिक्षा अभियानाकडून प्राप्त निधीतून शाळांचे बांधकाम करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्याकडे किती शाळा धोकादायक आहेत. याची माहिती नाही त्यांच्याकडे वेळोवेळी विचारणा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शाळा बांधकामात मोठा घोटाळा असण्याची शक्यता जि.प.सदस्यांनी वर्तवली. २०० शाळांना संरक्षण भींत नाही

जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती व नवीन खोल्यांचे बांधकाम , संरक्षण भितीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होतो. असे असतानाही २०० शाळांना संरक्षण भिंत नाही. काही शाळा वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

--

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषदSchoolशाळाnagpurनागपूर