मास्क न वापरणाऱ्या ८८ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:32+5:302021-03-08T04:08:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रविवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ८८ नागरिकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी रुपये ...

88 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या ८८ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या ८८ नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रविवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ८८ नागरिकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी रुपये ५०० याप्रमाणे ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यांत शोध पथकांनी ३५,००२ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला.

आतापर्यंत ५०० रुपये दंडाप्रमाणे २९,५३२ नागरिकांकडून १ कोटी ४७ लाख ६६ हजार दंड वसूल केला, तर २०० रुपये याप्रमाणे ५,४७० नागरिकांकडून १० लाख ३४ हजार दंड वसूल केला आहे.

नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत.

Web Title: 88 citizens fined for not wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.