गाडीच्या डिक्कीतून एटीएम कार्ड चोरून केले ८७ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:07 IST2021-04-21T04:07:46+5:302021-04-21T04:07:46+5:30
कारागृहातील कैद्यासह दोन मनोरुग्णांचा मृत्यू नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी असलेले मलकितसिंग करमासिंग कलोटी (७७) यांचे ...

गाडीच्या डिक्कीतून एटीएम कार्ड चोरून केले ८७ हजार लंपास
कारागृहातील कैद्यासह दोन मनोरुग्णांचा मृत्यू
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी असलेले मलकितसिंग करमासिंग कलोटी (७७) यांचे प्रकृती खराब झाल्याने उपचाराकरिता मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मानकापूर हद्दीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेले साजन हेला कोरकू (५१) यांची प्रकृती खराब झाल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील मोला रघुनाथ गायधने (८६) हे सुद्धा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर लकडगंज हद्दीतील गरोबा मैदान येथे राहणाऱ्या वत्सला ताराचंद बोरकर (७५) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.