शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसात ८७ मृत्यू, ३१५० नवीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 23:13 IST

नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने भयावह रूप धारण केले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३१५० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर ८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील २६४२, ग्रामीणमधील ४९६, जिल्ह्याबाहेरच्या १२ जणांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये शहरातील ६५, ग्रामीणमधील १० आणि जिल्ह्याबाहेरचे १२ जण आहेत. ऑगस्ट महिन्यात नागपूर जिल्ह्यात २४,१६३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ९१९ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे कोरोना आता अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर नियंत्रण मिळवण्याची प्रशासनाची कुठलीही तयारी दिसून येत नाही.नागपूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी १७०३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये नागपूर शहरातील १४७४, नागपूर ग्रामीणचे २२१ आणि जिल्ह्याबाहेरच्या ८ जणांचा समावेश आहे. तसेच ४१ मृत्यू झाले. यात २८ शहरातील, ५ ग्रामीणचे आणि ८ जिल्ह्याबाहेरचे आहेत. तसेच १ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात १४४७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील ११६८, ग्रामीणमधल २७५, जिल्ह्याबाहेरचे ४ आहेत. तर ४७ मृत्यू झाले. यात शहरातील ३७, ग्रामीणचे ५, आणि ४ जिल्ह्याबाहेरचे आहे.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३२,७०५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून ११३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २५,५०० शहरातील आहेत. ६९१३ ग्रामीणमधील तर २९२ जिल्ह्याबाहेरचे आहेत. एकूण मृतांमध्ये शहरातील ८५९, ग्रामीणमदील १६३ आणि जिल्ह्याबाहेरचे ११० आहेत.बुधवारी एंटीजन टेस्टमध्ये ७९९ पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी लॅबमध्ये ४३८, एम्सच्या लॅबमध्ये ७९, मेडिकलच्या लॅबमध्ये ८७, मेयोच्या लॅबमध्ये १८०, माफसू, ७८ आणि निरीच्या लॅबमध्ये ४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.दोन दिवसात बरे झाले २४१२ कोरोना रुग्णनागपूर जिल्ह्यात ज्या गतीने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या गतीने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसात २४१२ रुग्ण बरे झाले आहेत. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात १३५३ आणि २ सप्टेंबर रोजी १०५९ रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकूण २१,६५६ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ६६.२२ टक्के इतके आहे. परंतु नवीन मिळणाऱ्या पॉझिट्हि रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.अ‍ॅक्टीव्ह ९९१७बरे झालेले २१,६५६मृत ११३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर