८५ वर्षांच्या भोपत यांचे नामांकन दाखल
By Admin | Updated: November 9, 2014 00:47 IST2014-11-09T00:47:12+5:302014-11-09T00:47:12+5:30
लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली.

८५ वर्षांच्या भोपत यांचे नामांकन दाखल
ग्रामपंचायतीची निवडणूक : वॉर्ड क्रमांक ३ मध्ये वयोवृद्ध दाम्पत्य रिंगणात
अरविंद काकडे ल्ल आकोली (वर्धा)
लोकशाहीत १८ वर्षानंतर कोणत्याही वयात निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा लाभ घेत आकोली येथील वृद्ध दाम्पत्याने ग्रामपंचायतीकरिता उमेदवारी दाखल केली. ८५ वर्षांचा पती व ८० वर्षांची पत्नी या दोघांच्या नामांकनाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. या दाम्पत्याचे नाव भोपत सावळे (८५) व सुभद्रा भोपत सावळे (८०) असे आहे.
सेलू तालुक्यातील आकोली ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चर्चेत आली आहे. तीन वॉर्डात विभागल्या गेलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. सरपंचपद अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणताच गावात अनेकजण बाशिंग बांधून असतात. याकरिता अनेकांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली. या निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी शनिवारी येथील भोपत रामचंद्र सावळे (८५) व सुभद्रा भोपत सावळे (८०) हे दोघे त्यांचे युवा समर्थक राहुल दरणे, अमोल गुडधे व इतर सहकाऱ्यांसह सेलूच्या तहसील कार्यालयात अॅटोने दाखल झाले. वृद्ध दाम्पत्य असल्याने काहींनी त्यांना आज सुटी असल्याने निराधाराचे कार्यालय बंद आहे, आज सोमवारी या असे सांगितले. यावर उत्तर देत या दोघांनीही आम्ही निराधारांचा लाभ घेण्याकरिता नाही तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहायला आलो. यावर उपस्थितीतात चांगलाच हशा पिकला. लागलीच या वृद्ध दांम्पत्याने एकमेकाला आधार देत निवडणूक अधिकाऱ्यापुढे हजर होऊन जोडीने उमेदवारी अर्ज सादर केला. वॉर्ड क्र. तीन मधून पतीने सर्वसाधारण तर पत्नीने महिलांच्या सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज सादर केला.