शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोना रुग्णाची लूट; अ‍ॅन्टिजन चाचणीचे ८०० तर आरटीपीसीआरचे २२०० रुपये शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

प्रयोगशाळेत जाऊन रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्याचे शुल्क ६०० रुपये असताना ८०० रुपये आकारले जात आहे, तसेच प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शुल्क १९००असताना २२०० ते २८०० रुपये घेऊन रुग्णांची लूट चालविली आहे.

ठळक मुद्दे-शासन दरात चाचणी होत नसल्याचे वास्तव 

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यात प्रत्यक्ष आजारापेक्षादेखील खासगीमध्ये उपचाराचा खर्चच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. याची सुरुवात खासगीमधील प्रयोगशाळेतून होत आहे. प्रयोगशाळेत जाऊन रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्याचे शुल्क ६०० रुपये असताना ८०० रुपये आकारले जात आहे, तसेच प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शुल्क १९००असताना २२०० ते २८०० रुपये घेऊन रुग्णांची लूट चालविली आहे.

साथरोग नियंत्रण कायद्यानुसार राज्यातील कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नसल्याचे निर्देश आहेत, परंतु त्याचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे. कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. पूर्वी दिवसभरात १० ते २० रुग्णांची नोंद व्हायची आता ती १७००च्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरुपामुळे काही वेळेस कोरोनाबाधित रुग्णांना ओळखणे कठीण जात आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.

पूर्वी प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर तपासणीचे दर ४५०० तर घरी जाऊन नमुना घेण्याचे दर ५२०० होते. नंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड चाचणीच्या सुधारीत दरांची यादी जाहीर केली. यात खासगी प्रयोगशाळांना रुग्णालयांतून घेतलेल्या नमुन्यांसाठी २२०० रुपये तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास त्यासाठी २,८०० रुपये दर ठरविण्यात आले. दरम्यान भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून अ‍ॅन्टिजन व आरटीपीएसआर तपासणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीने ‘मिशन बिगीन’ अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने तपासणीसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम किट्स व पीपीई किट्सची उपलब्धता वाढल्याने व यांच्या किमती कमी झाल्याने तपासणीच्या खर्चातही कपात होणे आवश्यक असल्याचे शासनाला सुचविले. त्यानुसार ७ ऑगस्ट रोजी शासनाने एक अध्यादेश काढून कोविड चाचणीचा दर साधारण ३०० रुपयांनी कमी के ला. परंतु त्याचे पालन होत नसल्याने रुग्ण भरडला जात आहे.

अ‍ॅन्टिजन चाचणीचे ६०० रुपये दर शासनाच्या सुधारीत दरानुसार ‘सीएलआयए फॉर अ‍ॅन्टिबॉडीज’ चाचणी प्रयोगशाळेत जाऊन के ल्यास ४५० रुपये तर घरी बोलावून नमुना दिल्यास ६०० रुपये, ‘सीएलआयए फॉर अ‍ॅन्टिबॉडीज’ चाचणी रुग्ण प्रयोगशाळेत जाऊन के ल्यास ५०० रुपये, घरी बोलावून नमुने दिल्यास ७०० रुपये, रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी प्रयोगशाळेत जाऊन के ल्यास ६०० तर घरी बोलावून नमुने दिल्यास ८०० रुपये आकारण्याचे दर आहेत.आरटीपीसीआरचे १९०० रुपये दरप्रयोगशाळेत स्वत: जाऊन आरटीपीसीआर तपासणी केल्यास १९०० रुपये, हॉस्पिटलमध्ये जाऊन नमुने घेतल्यास २२०० तर घरी बोलावून नमुने दिल्यास २५०० रुपये आकारण्याचे सुधारीत दर आहेत.४० वर लॅबमध्ये अ‍ॅन्टिजन तर पाचवर लॅबमध्ये आरटीपीसीआरनागपुरात सुमारे ४० वर खासगी लॅबमध्ये रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी के ली जात आहे. तर पाचवर मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. वाढीव शुल्क घेणाऱ्या काही लॅब आपण पकडले जाऊ या भीतीने शुल्काची पावती देत नसल्याचाही तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेने प्रत्येक झोनमध्ये नि:शुल्क अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर चाचणीची सोय केली आहे. सध्याच्या स्थितीत ३५ वर केंद्रांवर ही सोय उपलब्ध आहे.चाचणीचा खर्च व ठरवून दिलेले शुल्क यात मेळ बसत नाहीअ‍ॅन्टिजन चाचणीसाठी लागणारी एक किट ५०४ रुपयांना मिळते. त्यात जीएसटी वेगळा लागतो. संशयित कोरोनाबाधितांची चाचणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागते. पूर्वी हेच मनुष्यबळ ७ ते ८ हजार रुपयाच्या वेतनावर काम करायचे, आता त्यांना १५ हजार रुपये महिन्याला द्यावे लागत आहे. ही चाचणी करण्यासाठी स्वतंत्र खोली व इतरही सोयींची गरज पडते. ग्लोव्हज, मास्क व पीपीई किट लागते. जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्याचा खर्चही असतो. रुग्णाचा दोन पानाचा फॉर्म भरुन तो तीन ठिकाणी पाठवावा लागतो. यामुळे हा चाचणीचा खर्च व शासनाने ठरवून दिलेला दर याचा मेळ बसत नाही. आरटीपीसीआर चाचणीचे सुद्धा तसेच आहे. चाचण्यांचे दर वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.-डॉ. वासुदेव वासे अध्यक्ष, विदर्भ असोसिएशन ऑफ पॅथालॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस