शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

८० फुट उंच टॉवरवर मनोरुग्णाचे वेडसर चाळे; खाली अनेकांच्या जिवाची धाकधूक

By नरेश डोंगरे | Published: April 16, 2024 11:17 PM

त्याने तास-दीड तास केला अनेकांचा मानसिक छळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८० फुट उंच असलेल्या टॉवरवर चढून एक मनोरुग्ण बिनधास्त वेडसर चाळे करीत होता. तर, तो टॉवरवरून पडला तर काय होऊ शकते, याची कल्पना असल्याने खाली उभ्या शेकडो जणांच्या जिवाची धाकधूक होत होती. कामठी मार्गावर मोक्याच्या ठिकाणी मंगळवार दुपारी तास-दीड तास अनेकांना घायकुतीस आणणारा हा वेडसर प्रकार सुरू होता. अखेर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने त्या बहाद्दराला खाली उतरवले अन् अनेकांचा जीव भांड्यात पडला.

२४ तास वर्दळ असणारा चाैक म्हणून यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (कामठी मार्गावर) ऑटोमोटीव्ह चाैक आहे. या चाैकात २५ मिटर (साधारणत: ८० फुट) उंचीचा मोबाईल टॉवर आहे. या टॉवरवर आज दुपारी एक मनोरुग्ण चढला. सिग्नलवर थांबलेल्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी दुपारचे २ वाजले होते. गस्तीवर असलेले ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर आपल्या सहकाऱ्यांसह लगेच तेथे दाखल झाले. त्यांनी लाऊड स्पिकरच्या माध्यमातून त्या तरुणाला 'तेथेच सुरक्षित रहा, आम्ही तुला सुखरूप उतरवतो', असे सांगितले. तो आवाज त्याच्या कानावर गेला की नाही, कळायला मार्ग नाही. मात्र, खाली मोठी गर्दी जमल्याचे आणि पोलीस काही तरी आवाहन करीत असल्याचे पाहून की काय, त्या तरुणाला अधिकच चेव आला. त्याने अगदी वरच्या टोकावर जाऊन वेडसर चाळे सुरू केले. त्यामुळे पोलिसांसकट साऱ्यांनाच दरदरून घाम फुटला. हा खाली पडला तर काय होऊ शकते, याची कल्पना आल्याने साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकल्यासारखा झाला होता.

डोळ्यात जीव आणून त्या तरुणाकडे अनेक जण पाहत होते. दरम्यान,तत्परता दाखवत ठाणेदार बेदोडकर यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. ते येईपर्यंत जर तो पडला तर त्याला अलगद झेलून घेण्यासाठी खबरदारी म्हणून खाली नागरिकांच्या मदतीने सुरक्षित घेराही बनविला. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांनी हायड्रोलिक क्रेनच्या आधारे टॉवरचे टोक गाठून त्या तरुणाला क्रेनच्या ट्रॉलीत बसवले. दुपारी ३.३० च्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरवण्यात आले. आतापर्यंत डोळ्यात प्राण आणून त्याला काही होऊ नये म्हणून मनोमन प्रार्थना करणाऱ्या शेकडो बघ्यांपैकी अनेकांनी त्या वेडसर तरुणाला शिव्या घालत आपली भडास काढून घटनास्थळ सोडले.

रात्रीपर्यंत घेतली पोलिसांची फिरकीपोलिसांनी त्याला ठाण्यात आणून त्याचे नाव, पत्ता विचारले. कशासाठी हा आत्मघातकी प्रकार केला, तेही जाणून घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, या पठ्ठ्याने ठाण्यात आल्यानंतर पोलिसांचीच फिरकी घेणे सुरू केले. खाण्यापिण्याच्या चिजवस्तू देऊनही तो पोलिसांना चुकवत होता. देवीलाल रामप्रसाद यादव असे नाव सांगणारा हा व्यक्ती कधी आपण यूपी, कधी बिहार, कधी एमपी तर कधी छत्तीसगडमध्ये राहत असल्याचे सांगत होता. रात्रीपर्यंत त्याने आपला पत्ता पोलिसांना सांगितला नाही. तो मनोरुग्ण असल्याचा अंदाज बांधून त्याला रुग्णालयात पाठविण्याचा विचार पोलीस करीत होते.