शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात कोरोनाबाधितांचे ७५ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:15 IST

कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यांच्या काळात रुग्णसंख्येने सोमवारी ७५ हजारांचा टप्पा गाठला. आज ९९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ७५,८१५ तर मृतांची संख्या २,४३८ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्येवरही याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. नागपूर जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधितांचा वेग वाढला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत मोठ्या संख्येत रुग्णांची भर पडली. यामुळे चाचण्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आज सर्वाधिक कमी म्हणजे, २७०१ चाचण्या झाल्या. यात ११८५ आरटीपीसीआर चाचण्या असून रॅपिड अ‍ॅन्टिजेनच्या १,५१६ चाचण्या आहेत. एम्सच्या प्रयोगशाळेतून ५३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ११०, मेयोच्या प्रयोगशाळेतून १८०, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६७ तर खासगी लॅबमधून २८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. -२८ दिवसांत ४६ हजार रुग्णांची नोंद आॅगस्ट महिन्यात रुग्णाची एकूण संख्या २९,५५५ होती. जुलै महिन्याच्या तुलनेत २४,१६३ रुग्णांची भर पडली. परंतु सप्टेंबर महिन्यातील या २८ दिवसांतच ४६ हजार २६० रुग्णांची नोंद झाली. मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आॅगस्ट महिन्यात ९१९ मृत्यू होते. तर या महिन्यात आतापर्यंत १,५१९ मृत्यूची भर पडली आहे. यामुळे पुढील महिन्यात भयावह आकडेवारी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. -१४३१ रुग्ण बरे मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या तुलनेत जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. सोमवारी १,४३१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५९,६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून याचे प्रमाण ७८.७४ टक्के आहे. यात शहरातील ४८,१२३ तर ग्रामीण भागातील ११,५७४ रुग्ण आहेत. सध्या १३,६८० रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत भरती आहेत. -कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या घटली नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने २०वर कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारले आहेत. होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र सुरुवातीला महत्त्वाचे ठरले. परंतु आता रुग्ण ‘सीसीसी’मध्ये राहण्यापेक्षा होम आयसोलेशनमध्येच राहणे पसंत करीत आहेत. होम आयसोलेशनच्या कठोर नियमांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने घरातील इतर लोकांना लागण होत असल्याचे समोर आले आहे. सध्या ८,७५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर सीसीसीमध्ये हजारही रुग्ण नाहीत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ४,१९३बाधित रुग्ण :७५,८१५बरे झालेले : ५९,६९७उपचार घेत असलेले रुग्ण : १३,६८०मृत्यू : २,४३८

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर