शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर जागा ७५ पण प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे भरणार केवळ ३६; आयुर्वेद पीजी विद्यार्थ्यांसमोर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:55 IST

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : रिक्त पदे, कंत्राटी शिक्षक, निवृत्तीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांसाठी मंजूर असलेल्या ७५ जागांपैकी या वर्षी केवळ ३६ जागांवरच प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची मोठी कमतरता, कंत्राटी पद्धतीवरील शिक्षकांचे अस्थैर्य आणि आगामी सेवानिवृत्तीमुळे पीजी अभ्यासक्रमाच्या जागांवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याबरोबरच आयुर्वेद शिक्षणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात १० विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांना मंजुरी प्राप्त आहे. या विषयांसाठी एकूण ७५ पीजी जागा मंजूर आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या संख्येमुळे मागील वर्षी ४० पीजी जागा भरण्यात आल्या होत्या. तर या वर्षी शिक्षकांची रिक्त पदे, कंत्राटी शिक्षक आणि पुढील दोन वर्षात निवृत्त होणारे शिक्षक यामुळे ही संख्या आणखी ४ ने कमी होऊन ३६ पर्यंत येण्याची शक्यता आहे. मंजूर पदांपैकी निम्म्या पीजी जागांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याने आयुर्वेदिक शिक्षणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

पदभरती आणि नवीन प्रस्तावसध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरती आणि बढतीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच १४ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पीजी जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळाल्यास पीजीच्या जागा वाढण्याची शक्यता महाविद्यालय प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

अॅडिशनल पद नसल्याने चार विषयांत पीजींना फटकाद्रव्यगुण, स्त्रीरोग, बालरोग आणि पंचकर्म या चार विषयांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत. मात्र, अॅडिशनल सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांना शासनाची मंजुरी प्राप्त नाही. त्यामुळे या चारही विषयांत पीजी जागांना फटका बसला आहे.

शिक्षकांची कमतरता आणि कंत्राटी पद्धतीचा फटकामहाविद्यालयात एकूण ६६ पदे मंजूर आहेत. यांपैकी फक्त ३२ पदे कायमस्वरूपी भरलेली आहेत, तर २५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. ९ पदे अजूनही रिक्त आहेत. कंत्राटी पदे ही ११ महिन्यांसाठी असतात. विद्यापीठाच्या निकषानुसार, पीजी गाइडसाठी शिक्षकांची पदे कायमस्वरूपी असणे आवश्यक असते.

निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा पीजीला फटका

  • विद्यापीठाच्या निकषानुसार प्राध्यापकाला ३ तर सहयोगी प्राध्यापकाला २ पीजी विद्यार्थी मिळतात. परंतु, ज्यांची निवृत्ती २४ महिन्यांच्या आत असेल, त्यांना पीजी विद्यार्थी मिळत नाही.
  • प्राप्त माहितीनुसार, रोगनिदान या 3 विषयातील एक प्राध्यापक याच वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. तर याच विषयातील एक सहयोगी प्राध्यापक पुढील वर्षी निवृत्त होतील.
  • यामुळे एकूण ५ पीजी जागांचे 3 नुकसान होणार आहे. शालाक्य तंत्र या विषयात एकच कायमस्वरूपी शिक्षक आहेत आणि तेही या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत.
  • त्यामुळे या विषयात एकही पीजी जागा भरली न जाण्याची शक्यता आहे. कायाचिकित्सा या विषयामध्ये एक सहयोगी प्राध्यापक पुढील वर्षी निवृत्त होत आहेत, ज्यामुळे या विषयात २ जागांचे नुकसान होणार आहे.
टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयnagpurनागपूर